Watch Video: 'मोदी माझे गुरु' आरोग्यमंत्री राणेंचा पंतप्रधानांसाठी खास व्हिडिओ, म्हणाले "मी सामान्य कार्यकर्ता"

PM Modi birthday Vishwajeet Rane: गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी देखील एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या
pm modi birthday viral video
pm modi birthday viral videoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Vishwajeet Rane on meeting PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी देखील एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओमध्ये त्यांनी मोदींना 'माझे गुरु' असे म्हटले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे माझ्यासारख्या एका सामान्य भाजप कार्यकर्त्याला प्रेरणा मिळाल्याचे म्हटले आहे.

याशिवाय आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, 'जगातील एका मोठ्या नेत्याला आणि माझ्या गुरूंना भेटण्याचा मला सन्मान मिळाला. एक सामान्य भाजप कार्यकर्ता म्हणून, मला त्यांच्या दूरदर्शी विचारातून आणि देशाप्रती असलेल्या अथक समर्पणातून खूप प्रेरणा मिळते.'

'राष्ट्र प्रथम' धोरणाने दिला नवा उद्देश

पंतप्रधान मोदींच्या 'शून्यापासून ते शिखरापर्यंत'च्या प्रवासाने मला खूप काही शिकवले, असेही राणे म्हणाले. 'त्यांनी केलेली शांत सुरुवात ते भारताच्या विकास गाथेचे नेतृत्व करणारा प्रवास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लोकांशी त्यांचा असलेला संवाद आणि आपुलकी जवळून पाहिल्यानंतर माझ्या मनात त्यांच्या नेतृत्वाबद्दल असलेला आदर आणखी वाढला.'

पंतप्रधान मोदींनी 'राष्ट्र प्रथम' आणि 'विकसित भारत' यावर दिलेल्या भरमुळे केवळ धोरणेच बदलली नाहीत, तर माझ्यासारख्या लाखो भारतीयांमध्ये एक नवीन अभिमान आणि उद्देश निर्माण झाला आहे, असेही राणे यांनी स्पष्ट केले. या वैयक्तिक संवादामुळे पक्ष आणि देशाच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत घेण्याचा माझा निर्धार आणखी मजबूत झाला आहे, असेही त्यांनी म्हटले.

pm modi birthday viral video
PM Modi Birthday: "मोदीजी दूरदर्शी नेते" मुख्यमंत्र्यांनी केले खास ट्विट; 75व्या वाढदिवसानिमित्त गोव्यातून शुभेच्छांचा वर्षाव

आरोग्यमंत्री राणे यांनी 'सप्त गोमाता मंदिरा'ला दिली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सुरू असलेल्या 'सेवा पंधरवडा' कार्यक्रमांतर्गत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी 'नाणूस अखिल विश्व गोसंवर्धन केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी 'सप्त गोमाता मंदिरा'चे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. राणे यांनी या भेटीदरम्यान मंदिराच्या परिसरात वृक्षारोपणही केले. केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Viswajit Rane Delhi visit
Vishwajit Rane Opposition Statement
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com