FC Goa : प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखत नाही, सर्वांचाच आदर : एफसी गोवा प्रशिक्षक मानोलो मार्केझ

ड्युरँड कपसाठी सज्ज
manolo marquez
manolo marquezDainik Gomantak
Published on
Updated on

Durand Cup 2023: प्रतिस्पर्धी नवखा असो किंवा कमकुवत, आम्ही कोणालाच कमी लेखत नाही, सर्वांचाच आदर करतो, असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी गुरुवारी संघाच्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धा तयारीविषयी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी संघातील खेळाडू रॉलिन बोर्जिसही उपस्थित होता. एफसी गोवा प्रशिक्षकाची पत्रकार परिषद आभासी पद्धतीने झाली.

manolo marquez
WI vs IND 1st T20: टीम इंडियासाठी आजचा खास दिवस! 'या' 2 युवा खेळाडूंचे पदार्पण

मार्केझ म्हणाले, ‘‘आमचा गट अजिबात सोपा नाही. प्रत्येक संघाप्रती आदर वाटतो. काही संघ नवखे असले, तरी मोठ्या संघांविरुद्ध खेळताना ते जास्त प्रेरित होतात. मी शिलाँग लाजाँग संघाचा व्हिडिओ पाहिला. त्याचे खेळाडू खूप वेगाने धावतात, जे आमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. गटातील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. एखाद्या पराभवामुळे आव्हान गटसाखळीत संपू शकते.’’

‘‘संघाचे सराव शिबिर आतापर्यंत समाधानकारक असून मोसमपूर्व तयारीच्या दृष्टीने ड्युरँड कप स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. गटसाखळीतील तिन्ही सामने जिंकण्याचे पहिले लक्ष्य असून करंडक जिंकण्याचे त्यापुढील उद्दिष्ट असेल. अधिकाधिक सामने खेळायला मिळावेत यासाठी आम्ही इच्छुक आहोत,’’ असे मार्केझ म्हणाले. फक्त पाच परदेशी खेळाडू उपलब्ध असल्याने भारतीय खेळाडूंवर जास्त भर राहील हे ५४ वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शकाने मान्य केले.

manolo marquez
Bondla Wildlife Sanctuary : बोंडला’ला उतरती कळा; वनमंत्र्यांची माहिती

प्रत्येक सामना खेळण्यासाठी मेहनत ः रॉलिन

मूळ गोमंतकीय ३१ वर्षीय रॉलिन बोर्जिस याचा एफसी गोवातर्फे यंदा पहिलाच मोसम आहे. त्याविषयी तो म्हणाला, ‘‘या क्लबतर्फे करारबद्ध झाल्याचा आनंद असून खेळण्यासाठी उत्साहित आहे. मी प्रत्येक सामना खेळण्यासाठी उपलब्ध असेन यासाठी मेहनत घेत आहे. जिंकणे हेच लक्ष्य आहे. प्रशिक्षक मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला दिवसागणिक आणखी प्रगती साधायची आहे. ’’

मोहीम ८ ऑगस्टपासून

एफसी गोवा संघा मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली साल्वादोर द मुंद पंचायत मैदानावर मागील दोन आठवडे सराव करत आहे. १३२व्या ड्युरँड कप स्पर्धेत त्यांचा ‘ड’ गटात समावेश आहे. त्यांचे सामने गुवाहाटी येथे होतील.

८ ऑगस्ट रोजी शिलाँग लाजाँग एफसीविरुद्धच्या लढतीने एफसी गोवाच्या स्पर्धेतील मोहिमेला सुरवात होईल. नंतर १२ ऑगस्टला नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध, तर १६ ऑगस्टला श्रीनगरच्या डाऊनटाऊन हिरोज संघाविरुद्ध शेवटचा गटसाखळी सामना होईल.

ड्युरँड कप स्पर्धेत एफसी गोवा

  • २०२१ मध्ये विजेतेपद

  • २०१९ मध्ये गट साखळीत दुसरे स्थान

  • २०२२ मध्ये साखळी फेरीत चौथा क्रमांक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com