HC judges inspect Smart City Panaji: स्मार्ट सिटीतील 18 प्रकल्प अपूर्ण, अजून तीन महिने हवी मुदतवाढ

HC judges inspect Smart City Panaji: काही प्रकल्पांचे काम अजून हाती घेण्यात आलेले नाही. ३० जूनपर्यंत पूर्ण होणार असलेले जे काही प्रकल्प खंडपीठासमोर सादर करण्यात आले आहेत
HC judges inspect Smart City Panaji
HC judges inspect Smart City PanajiDainik Gomantak

HC judges inspect Smart City Panaji

‘स्मार्ट सिटी’च्या कामात कोणी अडथळा आणला नाही, तर या प्रकल्पाची उर्वरित कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करता येतील, असे प्रतिज्ञापत्र आज ‘ईमॅजिन स्मार्ट सिटी’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केले.

सोमवारी न्यायाधीशांनी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांची पाहणी केल्यानंतर मंगळवारी हे प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यावर उद्या (बुधवारी) खंडपीठात सुनावणी होणार आहे. याआधी सरकारने ३१ मे पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करू, असे म्हटले होते.

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, एकूण १८ प्रकल्प पूर्ण होणे बाकी आहेत. त्यातील १४ प्रकल्पांचे काम शक्यतो ३० जूनपर्यंत पूर्ण होईल; तर ४ प्रकल्प ३१ मेपर्यंत पूर्ण होतील, अशी हमी देण्यात आली आहे. काही प्रकल्पांचे काम अजून हाती घेण्यात आलेले नाही. ३० जूनपर्यंत पूर्ण होणार असलेले जे काही प्रकल्प खंडपीठासमोर सादर करण्यात आले आहेत, त्यापैकी सांडपाणी निचरा आणि मलनिस्सारण हे दोन प्रमुख प्रकल्प आहेत. ही कामे मे. बागकिया कन्स्ट्रक्शनला देण्यात आली असून, ४५ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

कोर्टाला माहिती सादर

१८ प्रकल्प अद्याप पूर्ण होणे बाकी

१४ प्रकल्प ३० जूनपर्यंत मार्गी शक्‍य

०४ प्रकल्प ३१ मेपर्यंत होतील पूर्ण

सात कंपन्यांना कंत्राटे

- पणजीला २४ तास पाणी पुरवण्यासाठी मेसर्स बाकिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि. तसेच मेसर्स नार कन्स्ट्रक्शन प्राइव्‍हेट लिमिटेड एसबीएम प्रोजेक्ट इलेक्ट्रिकल्स व इतर अशा सात कंपन्यांना कंत्राटे देण्यात आली आहेत. हे काम जूनच्या अखेरीस पूर्ण होऊ शकेल.

- मांडवी नदी किनारी पदपथ आणि योगसेतू बांधण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. हे काम डीएचआयपीएल प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास ३०जूनपर्यंत कालावधी लागेल.

- रायबंदर येथे स्मार्ट सिटी बाजार प्रकल्प आणि मच्छीमरी राफ्ट तयार करण्याचे काम ‘आल्कॉन कन्स्ट्रक्शन’ला देण्यात आले आहे. या कामाची आत्ताच सुरुवात झाली असून दोन टक्के काम पूर्ण झाले आहे.

- जे चार प्रकल्प ३१ मे पर्यंत पूर्ण होणार आहेत, त्यामध्ये सांडपाणी निचरा जोडणी प्रकल्पाचा समावेश आहे. हे चार प्रकल्प चार वेगवेगळ्या कंपन्‍यांना देण्यात आले आहेत.

HC judges inspect Smart City Panaji
Liquor Seized: मडगावातून कर्नाटकात मद्याची वाहतूक, चोर्ला घाटात 36 लाखांचे अवैध मद्य जप्त

ठेकेदार व कामांची स्‍थिती

1) कॅफे भोसले चौकात सौंदर्यीकरणाचे काम मेसर्स बन्‍सल इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या आस्थापनाला दिले असून, मेसर्स ए. ई. कॉम इंडिया प्रायव्हेट ली. आस्थापनाला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे.

2) पणजीतील पदपथांचे काम मेसर्स एम. व्यंकटराव इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. हे काम सर्वांत शेवटी हाती घेण्यात येणार असून, आतापर्यंत १५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

3) ‘स्मार्ट रायबंदर’चे काम मेसर्स बन्‍सल इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडे असून हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित पूर्ततेसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ खंडपीठाकडे मागण्यात आली आहे.

4) रस्त्यांवर नवीन खांब टाकून रोषणाई करण्यासाठी ‘मेसर्स फ्लुइड पॉवर ऑटोमेशन एलएलपी’ला ठेका देण्‍यात आला आहे. आतापर्यंत ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. वीज खात्याची कामावर नजर आहे.

5) पाटो येथील लँडस्केपिंगचे काम मेसर्स शिवम इन्फ्राटेककडे आहे. मेसेज आर्किटेक्चर ऑटोनॉमस कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे काम अजून सुरू झालेले नाही. ते जून अखेरपर्यंत संपेल.

6) पाटो येथील ‘इंडोअर एम्युजमेंट’ पार्कचे काम मेसर्स हॉक ॲडव्‍हेंचर या आस्थापनाकडे आहे. कामकाज ३० जूनपर्यंत पूर्ण होईल.

7) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट इमारतीच्या इंटिरियर डिझाईनिंगचे काम मेसर्स बाकिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. हे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. ३० जूनपर्यंत पूर्ण होईल.

8) पाटो येथील पदपथाचे काम मेसर्स आरबीएस खांडेपारकर या कंपनीला देण्यात आले आहे. हे काम सर्वांत शेवटी घेतले जाईल व ते ३० जूनपर्यंत पूर्ण होईल.

9) इंटेलिजंट पब्लिक ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे काम मेसर्स रोमन टेक्नॉलॉजीला देण्यात आले आहे. कदंब महामंडळ यावर देखरेख करणार आहे. हे काम ८० टक्के पूर्ण झाले असून कार्यान्वित होण्यास जुलै महिना उजाडणार आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com