Sarvan News
Sarvan News Dainik Gomantak

सर्वण येथे गवताच्या गंजीला आग; हजारो रुपयांचे नुकसान

अग्‍निशमन दलाच्या सतर्कतेने आग नियंत्रणात
Published on

डिचोली: सर्वत्र चतुर्थीचा उत्साह संचारला असतानाच, सर्वण येथे लोकवस्ती जवळच गवताच्या गंजीला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. तर अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच मदतकार्य करून आग नियंत्रणात आणल्याने मोठी आपत्ती टळली. आग नियंत्रणात आणण्यासाठी दोन बंब पाचारण करावे लागले. तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात आली. मदतकार्यात स्थानिकांनीही भाग घेतला.

(Haystack fire reported at Sarvan caused loss of thousands of rupees)

Sarvan News
बॅसिलिका ऑफ बॉम जिझस महिनाभरासाठी राहणार बंद

ही घटना सर्वण येथे रविवारी ता.4 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ही आग नेमकी कशी लागली ते समजू शकले नाही. मात्र फटाक्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज आहे. सर्वण-एकतानगर परिसरातील शाणू सावंत आणि कुटुंबीयांनी गुरांची व्यवस्था म्हणून मोठ्या प्रमाणात गवताचा साठा करून ठेवला होता. मात्र गवत जळाल्याने शाणू सावंत यांच्यासमोर गुरांच्या खावडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Sarvan News
CM Pramod Sawant|...बोला ‘प्रमोद’जी बोला!

रविवारी सकाळी या गवतातून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच डिचोली अग्निशामक दलाला कळविण्यात आले. दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडींग फायर फायटर व्ही. गावकर यांच्या नेतृत्वाखाली चालक संदीप परब, नरेश गावकर, लवींदर साळगावकर आणि सुनील गावस या दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. गवत दूर करण्यासाठी जेसीबीही मदत घेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com