Arambol bal bhavan: 'छप्पर मोडकळीस, व्हरांडा जलमय' बालभवनच्या दुर्दशेमुळे पालक चिंतीत

हरमलमधील पालकांत चिंता : छप्पर मोडकळीस; व्हरांडा जलमय
government building
government buildingdainik gomantak
Published on
Updated on

हरमल येथील मध्यवर्ती व विद्यार्थ्यांअभावी बंद असलेल्या सरकारी प्राथमिक शाळा इमारतीत बालभवन केंद्र सुरू आहे. सध्या त्या इमारतीचे लाकूड जीर्ण झाले आहे. छपराला गळती लागली असल्याने पालकांत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे इमारतीची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

या इमारतीत पूर्वी प्राथमिक शाळेचे वर्ग भरत होते. दर निवडणुकीत इमारतीचा वापर निवडणूक केंद्र म्हणून होत असतो. येथे रॅम्प व प्रसाधन कक्ष बांधण्यात आले. सध्या त्या इमारतीत बालभवन केंद्र चालू असून, अंदाजे ४०-४५ विद्यार्थी गायन, वादन, पेंटिंग, नृत्य व चित्रकलेचे शिक्षण घेत आहेत. इमारतीस साधारण ५०-५५ वर्षे झाले असतील, त्या इमारतीची दोनवेळा दुरुस्ती केली होती. मात्र, सध्याच्या स्थितीमुळे पालकांत चिंता व्यक्त होत आहे.

government building
Harmal Beach: हरमल समुद्र किनाऱ्यावरील भिकाऱ्यांना आवरा

दरम्यान, मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर केंद्राच्या सृजन सोहळ्यात आले असता त्यांना इमारतीच्या स्थितीची कल्पना दिली होती. दुरुस्ती करून घेण्यास संबंधित खात्याला पत्रव्यवहार करण्यास सांगितले होते. तरी संबंधित खात्याने या इमारतीच्या स्थितीकडे लक्ष देऊन त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

government building
Harmal Beach: हरमल किनारी भागात हॉटेल्स हाऊसफुल्ल!

खोल्यांतील लाकडी फळ्या उखडल्या

या इमारतीत दोन वेगवेगळ्या खोल्या असून एका खोलीत गायन वर्ग असतो. त्या खोलीचे छप्पर जुने झाले आहे. दुसऱ्या खोलीच्या लाकडी फळ्या उखडल्या आहेत. पावसाळ्यात पाण्याचे शितोंडे उडत असल्याने मुलांना तेथे बसणे कठीण होते, त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या इमारतीच्या व्हरांड्याचे छप्पर मोडकळीस आले असून पावसाळ्यात व्हरांडा जलमय बनतो. त्यामुळे विद्यार्थ्यांत रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com