Harmal Beach: हरमल समुद्र किनाऱ्यावरील भिकाऱ्यांना आवरा

Harmal Beach: भिक मागणारे पुरुष, महिला रात्रीच्या वेळी मस्तपैकी दारूच्या बाटल्यांच्या संगतीत झिंगलेल्या अवस्थेत सकाळपर्यंत पदपथावर लोळत असल्याचे विदारक चित्र दिसून येते.
 Harmal Beach
Harmal Beach Dainik Gomantak
Published on
Updated on

Harmal Beach: हरमल किनारी भागात पर्यटन हंगाम सुरू असल्याने देशी विदेशी पर्यटकांनी किनारा फुलून गेला आहे. पर्यटन संबंधित व्यावसायिक व्यस्त असून ख्रिसमस, नववर्ष स्वागतासाठी परप्रांतीय भिकारी महिला व पुरुषांची संख्या वाढली असून समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्याला बाधा पोचत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

गेले कित्येक दिवस ही स्थिती किनारी मार्ग, पार्किंग व किनाऱ्यावर दिसत आहे. दिवसा फिरून भिक मागणारे पुरुष, महिला रात्रीच्या वेळी मस्तपैकी दारूच्या बाटल्यांच्या संगतीत झिंगलेल्या अवस्थेत सकाळपर्यंत पदपथावर लोळत असल्याचे विदारक चित्र दिसून येते.

ती मंडळी रात्रीच्या वेळेत पदपथावर झोपतात व दिवसा त्याच ठिकाणी ठाण मांडून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे भिक मागून गुजराण करीत असल्याचे चित्र आहे. फुगे व खेळणी घेऊन विकणाऱ्या या महिला भिक मागताना सर्रासपणे दिसत असल्याने त्यांना हाकलून लावण्यापेक्षा पोलिसांनी त्यांना समज देऊन पाठवून द्यावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कित्येक परप्रांतीय अल्पवयीन मुली - तान्ह्या लहान मुलांना कडेवर घेऊन देशी - विदेशी पर्यटकांपुढे गयावया करीत असल्याचे चित्र दिसते व त्याचे चित्रण विदेशी मंडळी करून, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी मीडियावर व्हायरल करून पर्यटन स्थळाचे नाव बदनाम करीत असल्याचे नागरिक एडविन मशादो यांनी सांगितले. गोव्यात अशा लोकांच्या वावरामुळे पर्यटन स्थळाला गालबोट लागत आहे, असेही ते म्हणाले.

 Harmal Beach
Vasco : पत्रकार परिषदेत तक्रारदाराला चपलांचा हार घालणार अटकेत; हल्ला केल्याचा आरोप

तृतीयपंथीयांची अरेरावी...

हरमल या भागात भिकाऱ्यांबरोबरच तृतीयपंथीयांची अरेरावी बरीच वाढली असून ते पर्यटकांकडे पैशांची मागणी करतात, शिवाय कित्येक व्यावसायिकांकडे ते अरेरावी करून पैसे उकळत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी संताप व्यक्त करीत आहेत.

त्यांना निघून जाण्याचे सांगितल्यास उद्घटपणे व अर्वाच्च भाषेतून पाणउतारा करीत असल्याच्या तक्रारी असल्याने पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पंचायत समितीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहून गैरप्रकारांना थारा देऊ नये व पोलिसांच्या मदतीने भिकारीमुक्त पर्यटनस्थळ करण्याची मागणी होत आहे.

हरमल पर्यटन किनारी भागात वास्तव्यास असलेल्या भिकाऱ्यांमुळे पर्यटकांना भयंकर मानसिक त्रास होत असतो. भिकारी मंडळी रस्त्याच्या नजीक वास्तव्य करून असल्याने अपघाताची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पंचायतीतर्फे करण्यात येईल. - भिकाजी नाईक, सरपंच, हरमल पंचायत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com