गेले अनेक दिवस भोम पठारावर केए ०२ एमडी ७७९४ नोंदणीकृत असलेली कार पार्क करून ठेवली आहे. ती कार बंद अवस्थेत असली तरी लोकांची वर्दळ नसताना, त्या कारचे दरवाजे उघडून कोणीतरी अनुचित काम करीत असल्याचा संशय आहे.
कुणीतरी ‘त्या’ कारचा दरवाजा उघडून आत बसतात. ही गोष्ट येथून जाणाऱ्या काहीजणांनी पाहिली. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्षक्च केले. त्या कारचा नेमके कोण वापर करतात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भर रहदारीच्या मार्गावर ही बेवारस कार असल्याने पोलिसांनी ती ताब्यात घ्यावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे.
हरमलातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर बेवारसपणे कार पार्किंग तसेच विनावापर चारचाकी गाड्या पार्क करून ठेवल्या जातात. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून भीषण अपघाताची शक्यता असल्याने वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
केपकरवाडा भागात कार, रिक्षा विनावापर पडलेल्या असून त्यांच्या मालकांना नोटीस पाठवून ती वाहने ताब्यात घेण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी समाजकार्यकर्ते प्रवीण वायंगणकर यांनी केली आहे.
दरम्यान, वाहतूक खाते आणि पोलिसांनी हरमलातील रस्ता मार्ग मोकळा करण्यासाठी तसेच अनैतिक गोष्टी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सर्व थरातून होत आहे.
मांद्रे-हरमल सीमेवर असलेल्या ब्ल्यू सी व्हिव हॉटेलसमोरील रस्त्यावर ओंगळवाण्या स्थितीत तीन-चार वाहने आहेत. त्यातील एका कारला गेल्या वर्षी आग लागली होती. मात्र, त्या मालकाने कारचा सांगाडा तसाच सोडून दिला. या वाहनाचा वाहतुकीस अडथळा नसला तरी त्या कारमुळे अन्य अनैतिक गोष्टी घडण्याची भीती असल्याने त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे मत नागरिक टोनी डिमेलो यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.