Hanuman Jayanti
Hanuman JayantiDainik Gomantak

Hanuman Jayanti : राज्यात हनुमान जयंती उत्साहात

मंदिरातून मारुतीरायांचा जयघोष : पाळणा, आरती, स्तोत्र पठण, कीर्तनांचे कार्यक्रम
Published on

डिचोली : राज्यात श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध हनुमान मंदिरे व इतर मंदिरातूनही हनुमान जन्मोत्सवानिमित्त पाळणा, आरती, स्तोत्र पठण करण्यात आले. सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी होती. काही ठिकाणी पालखी उत्सवही साजरा करण्यात आला. हनुमान मंदिरांतून पहाटेपासूनच पवनपूत्र श्रीरामभक्त मारुतीरायांचा जयघोष सुरू होता. हनुमान भक्तांनी श्री मारुतीरायांचे दर्शन घेऊन आपली सेवा अर्पण केली.

डिचोलीत जन्म, पाळणा सोहळा आदी पारंपरिक विधी आणि भक्तांच्या साक्षीने हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री

सुधा कॉलनी हनुमान मंदिर सुधा कॉलनी-बोर्डे, डिचोली येथील श्री हनुमान मंदिरात पहाटे रामकृष्बुवा गर्दे यांचे हनुमान जन्मावर कीर्तन झाल्यानंतर हनुमान जन्म आणि पाळणा सोहळा पार पडला. सुवासिनींनी श्री हनुमानाला पाळण्यात घालून पाळणागीत म्हटले. आरती आणि मारुती स्रोत म्हटल्यानंतर तीर्थप्रसाद झाला.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti: बजरंग बली की... राज्यात सर्वत्र हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

हनुमान जन्मोत्सवानिमित्त देवस्थानात लघुरुद्र स्वाहाकार, पूर्णाहुती आदी धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद झाला. सायंकाळी स्थानिक कलाकारांचे भजन झाले. शेकडो भाविकांनी श्री मारुतीरायाचे दर्शन घेऊन सेवा अर्पण केली. दरम्यान, भायलीपेठ-डिचोली येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी भजन झाले. याठिकाणीही श्री मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com