Goa Tourist : पर्यटन हंगामासाठी हडफडे सॅटर्डे नाईट मार्केट सजले! पर्यटकांची मोठी गर्दी

Goa Tourist : एका रात्रीत होते लाखोंची उलाढाल
 Saturday Night Market
Saturday Night Market Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourist : कळंगुट, देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेले हडफडे येथील सॅटर्डे नाईट मार्केट येत्या पर्यटन हंगामासाठी सजले आहे. शनिवार (ता.१८)पासून येथील प्रसिद्ध बाजाराला दिमाखात सुरवात झाली.

दरम्यान, सलीम्स सॅटर्डे नाईट मार्केट म्हणून परिचित असलेल्या येथील बाजाराचा आठवड्याच्या दर शनिवारी हजारोंच्या संख्येने देशी तसेच विदेशी पर्यटक आनंद घेत असतात.

यावेळी एका रात्रीतच लाखोंचा व्यवसाय केला जातो. पर्यटकांची मागणी असलेले विविध कपडे, विविध धातू व मातीपासून बनविण्यात आलेल्या मूर्ती, विविध प्रकारचे अलंकार, चांदीच्या अलंकारीत वस्तू,कमरपट्टे, इलेक्ट्राॉनिक वस्तू, विदेशी महागडी घड्याळे, विविध धातूंचे पुतळे, मूर्ती हजारोंच्या संख्येने विक्रीस उपलब्ध असतात.

देशी-चायनीज खाद्यपदार्थ, मासळीच्या डिशेस, भाजीपाव-वडापाव तसेच कांदा-मिरचीपासून बनविण्यात आलेले गोमंतकीय पदार्थ खवय्यांसाठी रात्रभर या भागात उपलब्ध असतात. विदेशी पाहुण्यांच्या सोयीसाठी देशी- विदेशी म्युझिकल वाद्यवृंद पथके, सोलो सिंगिंगचे कार्यक्रम उपस्थितांची करमणूक करत असतात.

 Saturday Night Market
Goa Politics: सर्वच मंत्री घोटाळेबाज

एप्रिलपर्यंत कार्यरत

हडफडेतील नाईट मार्केट तसेच हणजूण येथील फ्ली मार्केट गोवा मुक्तीपासूनच या भागात भरला जातो. दरवर्षी आॉक्टोबर-नोव्हेंबरच्या सुरवातीला सुरू होणारे येथील सॅटर्डे नाईट मार्केट मार्च ते एप्रिलपर्यंत पर्यटक तसेच स्थानिकांच्या सेवेसाठी कार्यरत असते.

पंचायतीला होतो फायदा

आठवड्यातून फक्त एकाच रात्री अर्थातच दर शनिवारी येथे भरणाऱ्या सॅटर्डे नाईट मार्केटात स्थानिक तसेच परप्रांतीय व्यावसायिकांचा लाखोंचा व्यवसाय होतो. येथील मार्केटचा भत्ता कराच्या रूपाने स्थानिक पंचायतीच्या फंडात जमा होतो, अशी माहिती नागवा-हडफडे गावचे सरपंच रोशन रेडकर यांनी दिली.

हडफडे येथे दरवर्षी भरत असलेल्या सॅटर्डे नाईट मार्केटमध्ये पर्यटकांची सुरक्षा अग्रस्थानी मानून हणजूण पोलिस रात्रभर आपली सेवा देत असतात. शिवाय जागोजागी खासगी सुरक्षा एजन्सीचे गार्डही या भागात रात्रभर पहारा देत असतात. या कामात स्थानिक पंचायत मंडळ तसेच स्थानिक लोकांचेही सहकार्य मिळते.

- प्रशाल देसाई, पोलिस निरीक्षक हणजूण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com