Goa Politics: सर्वच मंत्री घोटाळेबाज

Goa Politics: काँग्रेसचा आरोप भाजपकडून लोकशाहीचा खून
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: काँग्रेसमधून फुटून भाजपवासी झालेला आठ आमदारांचा गट हा त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी नव्हे, तर त्यांना दिलेल्या आश्‍वासनांमुळे गेला व त्यांच्यातील एका आमदारामुळेच ते उघड झाले आहे. विरोधात असलेला काँग्रेसचा गट फोडण्यामागे मास्टरमाईंड भाजपचा हात होता.

Goa Politics
Goa Politics: नीलेश काब्राल मिस्टर क्लीन !

भाजप सरकारमधील प्रत्येक मंत्री भ्रष्टाचार व घोटाळ्यात गुंतलेला आहे. या पक्षाने लोकशाहीचा खून केला आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आज केला.

मंत्रिमंडळातील फेरबदलासंदर्भात विचारले असता पाटकर म्हणाले, भाजप ही भ्रष्ट जुमला पार्टी बनली आहे. काँग्रेसच्या आमदारांना आमिषे दाखवून फोडण्‍यात आले आहे. या सरकारमध्ये एकामागोमाग एक असे अनेक घोटाळे घडले आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारमधीलच एका आमदाराने सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे या नोकऱ्यांसाठी प्रतीक्षेत असलेल्या अनेक उमेदवारांचे स्वप्न भंगले. हे सरकार युवा पिढीच्या भवितव्याशी खेळत आहे, असेही ते म्‍हणाले.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती प्रक्रियेत घोटाळा झाला असल्यास आपण स्वतःहून राजीनामा देऊ असे नीलेश काब्राल यांनी सांगितले होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार व मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्याने राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण आता ते देत असले तरी त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. कारण त्‍यामुळे ते दोषी आहेत हे सिद्ध होते.

त्यांचा राजीनामा भ्रष्टाचारामुळे घेतला की ते अकार्यक्षम आहेत म्‍हणून घेतला, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण द्यावे. काब्राल हे भ्रष्टाचारात गुंतल्यानेच सरकारने त्यांचे मंत्रिपद काढून घेतले आहे. घोटाळ्यात गुंतलेल्या मंत्र्यांची यादीच देतो, असेही पाटकर म्हणाले.

Goa Politics
Marina Project: मरिना प्रकल्पावरून गदारोळ

इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली आर्थिक लूट

काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांना दिलेले वचन पूर्ण करण्यास एक वर्षाचा काळ लोटला. या सरकारने विरोधकांची मजबूत बाजू खिळखिळी करण्यासाठी हा गट फोडला.

त्यामुळे सरकारला बहुमताच्या जोरावर लूट करण्यासाठी रान मोकळे मिळाले. विरोधकांची संख्याच कमी केल्याने ते बहुमताच्या जोरावर सर्व काही मंजूर करून घेत आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू आहे,. तसेच सुमारे 1.44 लाख चौ. मी. जमिनींची विक्री करून लूटमार सुरू आहे, असा आरोप अमित पाटकर यांनी केला.

नीलेश काब्राल यांना अहंकार नडला

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने गोव्यातील युवा पिढीला १० हजार नोकऱ्यांचे आमिष दाखवले होते. मात्र निवडणूक संपल्यानंतर सत्तेवर आल्यावर याच सरकारने नोकऱ्यांचा विक्री लिलाव सुरू केला. त्यामुळे या भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवण्याची वेळ आली असून योग्यवेळी गोमंतकीय मतदार आपला हिसका दाखवतील. कुडचडेत आमदार नीलेश काब्राल यांचा मोठासा प्रभाव नाही. त्यांनी तमनार प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल केली. कुडतडेतून दुहेरी रेल्वे मार्गाला पाठिंबा देत कोळसा हबला परवानगी दिली. अहंकार व स्वभाव त्यांना नडला. गोवा नष्ट करण्यास ते निघाले होते, असे पाटकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com