Guleli : राणेंमुळे आरोग्य क्षेत्राचा कायापालट - डॉ. शिवानंद बांदेकर

डॉ. शिवानंद बांदेकर : सॅटेलाईट ओपीडीचा जनतेने लाभ घ्यावा; गुळेलीत मेगा आरोग्य शिबिर
dr. shivanand bandekar
dr. shivanand bandekarDainik Gomantak
Published on
Updated on

गुळेली : राज्याच्या आरोग्य क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. नवनवीन साधन सुविधा निर्माण करून या भागाचे आमदार तथा गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आरोग्य विभागाचा कायापालट केला आहे असे प्रतिपादन गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी केले.

सॅटेलाईट ओपीडीसारखी योजना ग्रामीण आरोग्य केंद्रात राबवून आरोग्य सेवा शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्याचे काम राणे यांनी केले आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, बांबोळीसारख्या ठिकाणी रुग्णांना जावे लागू नये म्हणून थेट संपूर्ण आरोग्य सेवा लोकांचा दारात उपलब्ध करून देण्याचा प्रयोग आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. जनतेने या संधीचा लाभ घ्यावा.

आरोग्य सेवा संचालनालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ, ए. एस. जी. आय. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुळेली - सत्तरी येथे आयोजित मेगा आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन केल्यानंतर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाच्या डॉ. गीता काकोडकर, आरोग्यमंत्र्यांच्या सल्लागार डॉ. गीता देशमुख, ए. एस. जी. आय.चे डॉ. शाॅन, डॉ. ललीता, डॉ. केदार, डॉ. विकास, दंत महाविद्यालयच्या डॉ. अमिता कामत, कार्यक्रम संयोजक विनोद शिंदे,गुळेली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सूरज नाईक, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे, गुळेली पंचायतीचे सरपंच नितेश गावडे,

dr. shivanand bandekar
4 Summer Benefits Muskmelon: 'या' फळाच्या सेवनाने उन्हाळ्यात शरीराला होतात असंख्य फायदे; वजनही होतं कमी

उपसरपंच रत्नाकर कासकर, पंच अक्षिता अनिल गावडे, प्रशांती प्रशांत मेळेकर, ज्योती गावकर, सिद्धू गावकर, संतोषी नाईक, खोतोडाचे सरपंच नामदेव राणे उपस्थित होते. सूरज नाईक म्हणाले, की जनतेच्या सेवेसाठी या भागातील आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि त्यांचे सहकारी करीत असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. आरोग्यमंत्र्यांच्या प्रत्येक योजनेचा फायदा या भागातील नागरिकांनी करून घ्यावा. आपल्या विद्यालयाला त्यांचे नेहमी सहकार्य मिळते आणि यापुढेही मिळावे.

dr. shivanand bandekar
Mapusa Health News : डेंग्यू-मलेरियाबाबत ‘बार्देश’ची बैठक

यावेळी गुळेली ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश गावडे यांच्या पुढाकाराने मान्यवरांच्या हस्ते गुळेली पंचायत क्षेत्रातील सरकारी प्राथमिक विद्यालयांना पाणी शुद्ध करणारे फिल्टर भेट म्हणून देण्यात आले. सरकारी माध्यमिक विद्यालय गुळेलीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यांना नितेश देसाई, कविता पिरणकर, चंद्रकांत नाईक यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन डॉ. वैभव गाडगीळ यांनी केले.

dr. shivanand bandekar
Health Review Meeting : चाचण्यांचा वेग वाढवणार : विश्‍वजीत राणे

आरोग्य सेवा जनतेच्या दारी

विनोद शिंदे म्हणाले, की सत्तरीतील जनतेला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आरोग्य सेवा दारात देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. आपला तालुका म्हणजे आपला परिवार असे मानणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी आपल्या तालुक्यातील जनतेसाठी ही सेवा सुरू केली आहे. मेगा आरोग्य शिबिरांना मिळणारा प्रतिसाद पाहता अशा प्रकारची मेगा शिबिरे संपूर्ण राज्यात चालू करण्याची आरोग्यमंत्र्यांची इच्छा आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर भाजपतर्फे कर्नाटक निवडणुकीची मोठी जबाबदारी दिली असल्याने त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आज ते उपस्थित राहू शकले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com