प्रशिक्षक फेरांडोंचा एफसी गोवाला राम राम

आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याच्या अटीस चालना द्यावी, अशी विनंती हुआन फेरांडो यांनी केली आहे.
Football 

Football 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: करारातील नियमाच्या आधारे हुआन फेरांडो यांनी प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती एफसी गोवा (FC Goa) संघ व्यवस्थापनास केली आहे. ते आता एटीके मोहन बागान संघात रुजू होतील, अशी माहिती एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन यांनी रविवारी सोशल मीडियाद्वारे दिली.

<div class="paragraphs"><p>Football&nbsp;</p></div>
भारतीय नौदल गोवा लिबरेशन डायमंड ज्युबिली सोहळ्यात सामील

एटीके मोहन बागानने इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आठव्या मोसमातील खराब कामगिरीच्या कारणास्तव 64 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक अंतोनियो लोपेझ हबास यांना शनिवारी डच्चू दिला. त्यांची जागा आता स्पेनचेच चाळीस वर्षीय फेरांडो घेतील हे स्पष्ट झालेय. गतउपविजेत्या एटीके मोहन बागानने आयएसएल स्पर्धेत सहा सामन्यांतून आठ गुणांची कमाई केली आहे. फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने सुरवातीचे तीन सामने गमावले, नंतर दोन विजय व एका बरोबरीसह सात गुणांची कमाई केली आहे. शनिवारी रात्री एफसी गोवाने हैदराबादला 1-1 गोलबरोबरीत रोखले होते.

आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याच्या अटीस चालना द्यावी अशी विनंती हुआन फेरांडो यांनी केली आहे, जेणेकरून त्यांना एटीके मोहन बागान एफसीत रुजू होता येईल. त्यास मी खेदपूर्वक पुष्टी देत आहे. जोपर्यंत रक्कम आमच्या खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाणार नाही, असे एफसी गोवाचे अध्यक्ष अक्षय टंडन यांनी रविवारी सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरून जाहीर केले. एफसी गोवाच्या नव्या प्रशिक्षकाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असेही टंडन यांनी नमूद केले. फेरांडो यांच्या अनपेक्षित निर्णयामुळे एफसी गोवास धक्का बसला आहे ही बाब स्पष्ट आहे.

<div class="paragraphs"><p>Football&nbsp;</p></div>
डिचोलीत शासकीय मुक्तीदिन सोहळा उत्साहात

लक्षवेधक कारकीर्द

फेरांडो यांनी 2020-21 मोसमाच्या सुरवातीस एफसी गोवाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाने उपांत्य फेरी गाठली, पण मुंबई सिटीकडून पेनल्टी शूटआऊटवर हार पत्करल्यामुळे अंतिम फेरी हुकली. त्यानंतर एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत एफसी गोवाने चमकदार कामगिरी केली. या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या या स्पर्धेत फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना सहा सामन्यांतून तीन गुण नोंदविले. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत गुण नोंदविणारा पहिला भारतीय संघ हा मान एफसी गोवाने मिळविला होता. 2021-22 मोसमाच्या सुरवातीस यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोलकात्यात झालेल्या ड्युरँड कप स्पर्धेत एफसी गोवाने फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली विजेतेपद मिळविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com