गुजरात अंमली पदार्थ प्रकरण: कॉंग्रेसकडून सकोल चोकशीची मागणी

एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ गौतम अदानी यांच्या मुद्रा बंदरामध्ये पकडला गेला तरीही प्रसिद्धी माध्यमावर किंवा वृत्तवाहिन्यांवर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली नाही
Gujarat drug case: Congress demand inquiry
Gujarat drug case: Congress demand inquiry
Published on
Updated on

पणजी: गुजरात मधील गौतम अदानी यांच्या खाजगी मुद्रा बंदर या बंदरावर 3 हजार किलो. अमली पदार्थ पकडला गेला. मात्र याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या एकाही नेत्याने ब्र काढलेला नाही. त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांचे या अंमली पदार्थाच्या व्यवहाराला संरक्षण असावे असा संशय काँग्रेसला आहे. त्यामुळे या प्रकरणी विद्यमान सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींची चौकशी समिती नेमून या एकूणच अमली पदार्थ व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद पणजी येथे काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, प्रदेश समितीचे कार्यकारी अध्यक्ष आलेक्स सिक्वेरा व माध्यम समितीचे प्रमुख अमरनाथ पणजीकर उपस्थित होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ गौतम अदानी यांच्या मुद्रा बंदरामध्ये पकडला गेला तरीही प्रसिद्धी माध्यमावर किंवा वृत्तवाहिन्यांवर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली नाही किंवा त्याची चौकशी व्हावी अशी मागणीही झालेली नाही. सत्ताधारी भाजप पक्ष आणि गुजरातचे सरकारही याबाबत गप्पच आहे .त्यामुळे याप्रकरणी भाजपच्या नेत्यांचा सहभाग असावा असा संशय असून याची चौकशी व्हायलाच हवी. असे डॉ. मोहम्मद म्हणाल्या

Gujarat drug case: Congress demand inquiry
Goa Election 2022: राजकीय पक्षांची तोंडाची बॅटिंग सुरु...

एनसीबी अर्थात अमली पदार्थ नियंत्रण विभागाला गेले अठरा महिने प्रमुख लाभलेला नाही. तो का लाभलेला नाही? तसेच एनसीबी मोठ्या अमली पदार्थाच्या साठ्याच्या व्यवहाराची चौकशी न करता लहान-लहान व्यवहाराची चौकशी करते, पकडते असा दावा डॉ. शमा मोहम्मद यांनी मुंबईत काल क्रूजवर पकडल्या गेलेल्या अमली पदार्थाच्या विषयावर बोलताना सांगितले.

Gujarat drug case: Congress demand inquiry
Goa: कळंगुटमध्ये बनावट कॉल सेंटर टोळीचा पर्दाफाश

अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ गुजरातच्या बंदरामध्ये येत असून तेच अमली पदार्थ गोव्यामध्ये सुद्धा येत असावेत. याचीही चौकशी व्हायला हवी असे सांगून यापूर्वीह २५ हजार किलो कोकेन पकडले गेले होते मात्र त्याचीही सविस्तर चौकशी झाली नसल्याचे सांगून सुशांत सिंग केस असो किंवा काल क्रुझवर पकडलेली काही मंडळी असो ही कमी प्रमाणात अमली पदार्थ वापरत असताना त्यांचा मात्र मोठ्या प्रमाणात गवगवा केला जातो आणि गुजरातमधील बंदरात पकडलेल्या मोठ्या साठ्याची प्रसिद्धी होत नाही अशी खंतही यावेळी डॉ. मोहम्मद यांनी व्यक्त केली व याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान दोन न्यायाधीशांनी ची समिती स्थापून चौकशी व्हावी असे सांगून आशी ट्रेडिंग या विजयवाडा मध्यप्रदेशातील अस्थापनाची ही याप्रकरणी चौकशी व्हायला हवी अशी मागणी डॉ.शमा मोहम्मद यांनी यावेळी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com