जगद्‍गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांचे कार्य देशासह विदेशातही

मुख्यमंत्री प्रमोद सावंत : बायंगिणीत शिव सांस्कृतिक सभागृहात भोलेनाथाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
Gudipadwa utsav
Gudipadwa utsavDainik Gomantak

श्री सांप्रदायाशी गेल्या 20 वर्षापासून आपण जोडलो गेलो असल्याने जगद्‍गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांचे अविरत चालू असलेले कार्य देशापुरतेच राहिलेले नसून ते विदेशातही प्रसिद्ध होत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

बायंगिणी जुने गोवे येथे उभारण्यात आलेल्या शिव सांस्कृतिक सभागृहात मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमात ते बोलत होते.

Gudipadwa utsav
Panaji Smart City : पावसाळ्यातही पणजीत वाहने रुतण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज

डॉ.सावंत म्हणाले, की हे नववर्ष सुख समृद्धी देणारे, आरोग्यदायी, आनंदाचे भरभराटीचे जावो. नरेंद्रचार्यजी महाराजांच्या हस्ते जो या मंदिर पुनर्स्थापनेचा संकल्प होत आहे, आणि त्याच्या पूर्णाहुतीचे कार्य करण्याचा मान स्वामिजींनी मला दिला, त्याबद्दल आपण या श्री सांप्रदायाचा खूप खूप ऋणी आहे.

गोवा उपपिठावर भोलेनाथांचे भव्य मंदिर उभारण्यात येत असल्याने ज्या मंदिरात भोलेनाथांची स्थापना करण्यात आली होती, त्या मंदिरातील मूर्ती अन्यत्र स्थापित करण्यासाठी नव्या सभागृहाची गरज होती आणि ती गरज आज शिव सांस्कृतिक सभागृहामुळे पूर्ण करण्यात आली आहे.

Gudipadwa utsav
Panji News : विधवा प्रथेविरोधात कायदा करणे काळाची गरज

हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने या सभागृहात भोलेनाथांच्या मूर्तीची प्रतिष्ठापित करण्यात आली. गुढीपाडव्याचा सण असूनही गोव्याबरोबरच सिंधुदुर्ग, जोयडा, कारवार, उत्तर कन्नड, पूर्व पश्चिम कन्नड, बेळगाव ग्रामीण, बेळगाव शहर, बेंगळुरू, मुंबई, पुणे ,नाशिक, अशा विविध ठिकाणांहून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

यावेळी वीज मंत्री सुदिन ढवळीकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रमेश शेट्ये, राजेश फळदेसाई, जि.पं. अध्यक्ष सिध्देश नाईक, तसेच कर्नाटकातील आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी स्वामिजींचे दर्शन घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com