Panaji Smart City : पावसाळ्यातही पणजीत वाहने रुतण्याची शक्यता; तज्ज्ञांचा अंदाज

‘स्मार्ट सिटी’ रस्त्यांच्या कामात अभियांत्रिकी मूल्ये धाब्यावर
Smart City Accident
Smart City Accident Akshay Nirmale
Published on
Updated on

पणजीत सध्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाअंतर्गत राजधानीतील जवळपास सर्व रस्ते खोदले गेले असून नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रस्ते खोदल्याने वाहतूक कोंडी होतेच त्याशिवाय आरोग्य आणि व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

त्यातच मालवाहू ट्रक किंवा टॅंकर रस्त्यांमध्ये खचण्याचे प्रकार जणू नित्याचे झाले आहेत. तर पावसाळ्यात पणजीत रस्त्यात वाहन खचण्याचे प्रकार घडतील, अशी भीती अन् शक्यता तज्ज्ञांनी ‘गोमन्तक’शी बोलताना वर्तवली आहे.

Smart City Accident
Goa Accident News : भरधाव वाहनाची धडक; अभियंता जखमी

रस्त्यांचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली असली तरीही हे लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यातच रस्त्यांचे कोणतेही नियोजन न करता केल्याने गोंधळाची परिस्थिती उद्‍भवली आहे.

अभियांत्रिकी मूल्यांना धाब्यावर बसवून काम केले जात असल्याने वाहन रस्त्यात खचण्याचे प्रकार घडणार होते, ते आता होऊ लागले आहेत. पावसाळ्यात शहरात काय होणार हीच भीती निर्माण झाली आहे.

पूर्ण झालेले कामही योग्यरीत्या झाले नसणार कारण आताच काही ठिकाणी त्यासंदर्भात तक्रारी येत आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Smart City Accident
G20 Summit Goa: G20 शिखर परिषदेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती; VIP लोकांसाठी एक विशेष टीमही तैनात

"आज ज्या प्रकारे पणजीतील रस्त्यांचे वाटोळे केले गेले पणजी शहर रडत असेल. सकाळी खुला असलेला रस्ता संध्याकाळपर्यंत बंद करून घराचा रस्ता शोधणे हे लोकांसाठी चक्रव्यूह बनले आहे."

"खरे तर अडथळे तयार झाल्याने आणि रस्ते खचल्यामुळे, सरकारने पणजीला पर्यटकांसाठी मनोरंजन क्षेत्र म्हणून घोषित केले पाहिजे. पणजीतील लोकांनी अजूनही उठाव कसा केला नाही याचे मला आश्चर्य वाटते. आपण इतके गाफील झालो आहोत की सुन्न झालो आहोत की या सरकारला सोडून दिले आहे."

-अमित पालेकर, प्रदेशाध्यक्ष, आप

"पणजी शहर ज्या ठिकाणी उभे आहे, या जागी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता. त्यामुळे जेव्हा रस्ता खोदल्यानंतर मातीत वाळूचे प्रमाण आढळतात. आता स्मार्ट सिटीचे काम करताना ड्रिलिंग करून मोठ्या आकाराचे पाईप मलनिस्सारणासाठी घातले गेले आहे."

"परंतु पाईप आणि रस्त्यात अंतर जास्त होणार असून पावसाळ्यात पाणी वाळू ओढून घेणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या तळाखाली अंतर होऊन पोकळी निर्माण होणार आहे. आता केवळ अवजड ट्रक खचत आहेत, पावसाळ्यात पणजीत चारचाकी आणि दुचाकी देखील खचणार आहेत."

- कर्नल मिलिंद प्रभू, रस्ता तज्ज्ञ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com