सोनसोडोतील कचरा समस्येकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना?

मडगाव नगरपरिषदेने आधीच गोवा राज्य कचरा व्यवस्थापन महामंडळाला (GSWMC) कचरा व्यवस्थापनासंबंधीच्या समस्यांबद्दल लेखी स्वरूपात पत्र पाठवले होते.
Sonsodo wall collapse
Sonsodo wall collapseDainik Gomantak
Published on
Updated on

MARGAO: सोनसोडो कचरा यार्डवर कचरा प्रक्रिया करण्यात येत असलेल्या शेडमध्ये कचरा वाढल्याने या शेड जवळ असलेली भिंत कोसळून पडण्याची घटना काल सकाळी घडली. या घटनेने कचरा विल्हेवाटी बद्दलची मडगाव पालिकेची अनास्था पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

Sonsodo wall collapse
ढोलताशाच्या निनादाने दुमदुमली पणजीनगरी!

मडगाव (Margao) नगरपरिषदेने आधीच गोवा राज्य कचरा व्यवस्थापन महामंडळाला (GSWMC) कचरा व्यवस्थापनासंबंधीच्या समस्यांबद्दल लेखी स्वरूपात पत्र पाठवले होते. GSWMC ला लिहिलेल्या पहिल्या पत्रात, MMC मुख्य अधिकारी (CO) अग्नेलो फर्नांडिस यांनी सांगितले की, सोनसोडो (Sonsodo) येथे सध्याच्या 5,000 चौरस मीटरच्या शेडमध्ये (प्लांट) सुमारे 15,000 टन ओल्या कचऱ्याचा ढीग आहे. “ओल्या कचऱ्याच्या स्टॅकिंगमुळे आग लागण्यासारखी कोणतीही अपरिहार्य घटना घडू शकते, तसेच ओल्या कचऱ्यापासून मिथेन सारख्या ज्वलनशील वायूंची निर्मिती होते यामुळे होणारा अनर्थ टाळण्यासाठी साचलेला ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी, ही नम्र विनंती आहे.आशा आहे की तुम्ही या विनंतीचा प्राधान्याने विचार कराल,” असे फर्नांडिस यांनी पत्रात म्हटले आहे.

Sonsodo wall collapse
Goa Politics: सभापती पदासाठी विरोधी पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी

GSWMC ला त्यांच्या दुसर्‍या पत्रात, MMC ने विचारले होते की त्यांच्या अधिकारक्षेत्रात दररोज तयार होणारा सुमारे 35-40 टन ओला कचरा कॅकोरा सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट कार्यान्वित झाल्यावर पाठवू शकतो का. MMC अधिकार्‍यांनी असेही उघड केले की ते गोवा (Goa) राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (GSPCB) च्या उत्तराची वाट पाहत आहेत, जे त्यांच्या पूर्वीच्या विनंतीला मंजूरी देण्यासाठी 10 टन कचरा थेट GSWMC च्या साळीगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठवतात. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com