लोलयेतील बुडालेल्या मायलेकींच्‍या मृत्‍यूबाबत गूढ वाढतंच

लोलयेत खळबळ: माया पागीचा मृतदेह आढळला झुडपाला लटकलेल्‍या अवस्‍थेत
Death by drowning
Death by drowningDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: माया आनंद पागी (52) व तिची विवाहित कन्या अंकिता प्रकाश पोळजी (26) या तामणे-लोलये येथील माय-लेकीच्‍या मृत्‍यूचे गूढ वाढत चालले आहे. काल रविवारी अंकिताचा मृतदेह त्‍यांच्‍या घराशेजारी असलेल्‍या तळीत सापडला होता. तर, त्‍या तळीपासून अवघ्‍या 200 मीटर अंतरावर एका झुडपात माया पागी यांचा मृतदेह रविवारी उत्तररात्री गळफास लावलेल्‍या स्‍थितीत आढळला. विशेष म्‍हणजे मृतदेह झुडपाला लटकलेला होता व पाय जमिनीपासून अवघे तीन इंच वर होते. त्‍यामुळे या माय-लेकीच्‍या मृत्‍यूबाबत संशय व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

Death by drowning
गोव्यात मुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही अनिश्चितता

मिळालेल्‍या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे निवृत्त कर्मचारी असलेले आनंद पागी (माया पागी यांचे पती) यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. तत्‍पूर्वी त्यादिवशी ते आपल्‍या पत्नीला दुचाकीवरून काणकोण सामाजिक आरोग्यकेंद्रात तपासणीसाठी घेऊन गेले होते. घरी आल्‍यानंतर त्‍यांना झटका आला. हा सर्व प्रकार आल्‍यामुळेच घडला असा त्‍यांच्‍या पत्‍नीचा म्‍हणजेच माया पागी यांचा समज झाला होता. त्‍यामुळे त्‍या सैरभैर झाल्‍या होत्‍या. त्‍यांची मन:स्‍थिती ठीक नव्‍हती.दुसरीकडे आपल्‍या वडिलांच्‍या देखभालीसाठी त्‍यांची विवाहित मुलगी अंकिता माहेरी आली होती. काल रविवारी संध्याकाळी त्यांचे काही नातेवाईक आनंद पागी यांची विचारपूस करण्यासाठी घरी आले होते.

मात्र त्‍यांना माया-अंकिता ही माय-लेकी कुठे दिसली नाही. त्‍यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केल्‍यावर धावाधाव सुरू झाली. सर्वांनी त्‍यांच्‍या घराजवळील तळीकडे धाव घेतली असता अंकिताच्‍या चपला तेथे दिसून आल्‍या. त्‍यामुळे या दोघीही पाण्‍यात बुडाल्‍याचा संशय व्‍यक्त होऊ लागला.

मात्र त्‍यानंतर काही वेळातच अंकिताचा मृतदेह पाण्‍यावर तरंगताना आढळून आला, पण आईचा मृतदेह सापडला नव्‍हता. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्‍या जवानांनी पाण्‍यात शोध घेतला, पण हाती काहीच लागले नाही. शेवटी उत्तररात्री माया पागी यांचा मृतदेह तेथून जवळच असलेल्‍या झुडपाला लटकलेल्‍या अवस्‍थेत सापडला. तिच्या गळ्यात जाळीचा दोर होता. पण आता याबाबत काही प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.\

Death by drowning
गोव्यात काँग्रेसच्या पक्षांतर्गत लाथाळ्यामुळे पराभव ओढवला

माया पागीच्‍या मृतदेहावर अंत्‍यसंस्‍कार

दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्‍या हॉस्पिसियो इस्पितळात पोलिसांनी पाठवून दिले. त्यापैकी माया पागी यांच्‍या मृतदेहाची चिकित्‍सा करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज संध्‍याकाळी सहाच्‍या सुमारास तिच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. तर, अंकिता हिच्या पतीचे घर नावेली येथे असून तो परदेशात बोटीवर कामाला आहे. जोपर्यत तो गोव्यात येत नाही तोपर्यत तिच्या मृतदेहाची चिकित्‍सा स्थगित ठेवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com