Group Clash At Benaulim: बाणावली हल्ला प्रकरणातील संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी

तीन संशयित अजून फरार : पोलीसांचा शोध चालू
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Group Clash In The Restaurant Parking Lot At Benaulim: पार्किंगच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून अलॉयसीस बार्रेटो या युवकावर लोखंडी सळीने हल्ला केल्याचा आरोप असलेला संशयीत सॅम्युअल मास्कारेन्हस याला चार दिवसांची पोलिस कोठडीत सुनावण्यात आली.

सोमवारी कोलवा पोलीसांनी न्यायलयात हजर केले असता पोलिस कोठडीत सुनावली असून चौकशी करण्याचा आदेश दिला.

या प्रकरणातील इतर तीन संशयित अजून फरारी असून पोलीस त्यांच्या शोधात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक थेरन डिसोझा यांनी दिली.

Court
Goa Night Club: पर्यटकांवर हल्ला प्रकरणी दोन संशयित बाऊन्सरना अटक; आसगावातील क्लबमधील घटना

संशयित सॅम्युअल हा दहा दिवसांच्या सुटीवर लंडनमधून गोव्यात आला होता. रविवारी तो परत जाणार असल्याने त्याने मित्रांसोबत पार्टी केली होती.

रात्री 2 वाजता हॉटेलच्या बाहेर सॅम्युअल आणि त्याच्या मित्रांचा दुसऱ्या एका गटाशी वाद झाला व याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी सॅम्युअलच्या गटातील एकाने विरुद्ध गटातील एकावर रॉडने वार केला.

यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता या प्रकरणातील एक हल्लेखोर रविवारी दुपारी विमानाने लंडनला जाणार असल्याची माहिती मिळाली. संशयित सॅम्युअल मोपा विमानतळावर विमानात बसला असतानाच कोलवा पाेलिसांनी शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या.

या हल्ल्यात ॲलोयसिस बार्रेटो हा करमणे येथील युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pakistan Afghanistan Border Clashes Unama Report
bombay high court goa bench
Eknath Shinde Meets Traditional Fisherman Pele
Goa Police Seniority Dispute Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com