पणजी, कोलकाता येथील बिस्वा बांगला मेला प्रांगण येथे भारतातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे ट्रॅव्हल ट्रेड शो नेटवर्क, द ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर(टीटीएफ)मध्ये जागतिक स्तरावर प्रवाशांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने सहभागी झालेल्या गोवा पर्यटन विभागाने आपल्या पॅव्हेलियनमध्ये अभ्यागतांचे स्वागत केले.
ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर कोलकाता येथील गोवा पर्यटन शिष्टमंडळाचे नेतृत्व जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक (विपणन) दीपक नार्वेकर व पर्यटन विभागाचे माहिती साहाय्यक अधिकारी सुदत्त कांबळी करत आहेत.
गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) उपमहाव्यवस्थापक (विपणन) दीपक नार्वेकर म्हणाले की, ‘ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर कोलकाता २०२४’मधील आमचा सहभाग उल्लेखनीयपणे सुरू झाला.
जिथे अभ्यागतांना जगभरातील लोकांसाठी असलेल्या गोवा राज्याच्या विविध आकर्षक ऑफरबद्दल अधिक अनुभव घेता येईल आणि जाणून घेता येईल. पर्यटन विभाग केवळ संवर्धनालाच प्राधान्य देत नाही तर स्थानिक समुदायांच्या कल्याणाला चालना देऊन नैसर्गिक आणि सांस्कृतिक मालमत्तेचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करतो.
शाश्वत पर्यटनाला चालना
गोवा पर्यटन पॅव्हेलियनमध्ये अभ्यागतांनी गोव्यातील सुट्ट्या, पुनर्संचयित पर्यटन आणि एकादश तीर्थ सर्किटवर परस्परसंवादी प्रदर्शन आणि आकर्षक चर्चा अनुभवल्या. जे पर्यटन आणि शाश्वतता यांच्यातील सुसंवादी संबंध अधोरेखित करतात.
‘ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर कोलकाता २०२४’मध्ये पहिल्या दिवशी शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, अशी माहिती देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.