माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या वतीने सुरू केलेल्या ‘आरटीआय’ (माहिती अधिकार) पोर्टलचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष आमदार दिलायला लोबो, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, मनोरंजन संस्थेच्या अंकिता मिश्रा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या संकेतस्थळावर आरटीआय अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी https://rti.goa.gov.in. या पोर्टलचा वापर करता येईल.
दरम्यान, माहिती व प्रसिद्धी खात्याने गोवा मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘नवे पर्व’ या त्रैमासिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. सरकारने केलेली कामे, नव्या प्रकल्पांची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी या मासिकाचा उपयोग होईल.
पोर्टलची खासियत
सरकारी खात्याचे सर्व विभाग जोडले आहेत.
माहिती मागितल्यास अर्जदाराला ३० दिवसांच्या आत ती दिली जाईल.
कोणत्या खात्याची माहिती पाहिजे ती सविस्तर नोंदवावी लागेल.
३० दिवसांच्या आत माहिती मिळाली नाही, तर पुन्हा मागण्याचा अधिकार.
त्यातही अर्जदाराचे समाधान झाले नाही, तर माहिती आयुक्तांकडे तक्रारीचा पर्याय.
अर्जदाराला सुरुवातीला दहा रुपये ऑनलाईन भरावे लागतील.
माहिती ऑनलाईन पद्धतीने पेपर किंवा सीडी, पेनड्राईव्हवर दिली जाईल.
त्यासाठी शुल्क आकारले जाईल, त्याविषयीची माहिती अर्जदाराला मोबाईलवर मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.