Bhagwan Parshuram: गोव्यात उभारला जाणार ‘धनुष्यबाण’ धारी भगवान परशुरामांचा भव्य पुतळा, पर्यटन मंत्री म्हणाले...

गोव्याचा वारसा आणि अध्यात्मिक उत्पत्ती जगासमोर सादर केल्याने गोव्याची 'पार्टी करण्याचे ठिकाण' ही प्रतिमा सुधारण्यास मदत होईल.
Bhagwan Parshuram Structure To Be Build in Goa
Bhagwan Parshuram Structure To Be Build in GoaDainik Gomantak

Bhagwan Parshuram: गोव्याची भूमी संस्कृती, कला आणि परंपरेने समृद्ध आहे. इथे पौराणिक कथांचा वारसा पूर्वीपासून चालत आला आहे. गोव्याच्या निर्मिती बाबतच्या पौराणिक कथांना अनुसरून गोवा सरकार भगवान विष्णूचा अवतार भगवान परशुराम यांच्या सन्मानार्थ मांद्रे येथे ‘धनुष्य आणि बाण’ अशी प्रतिष्ठित भव्य रचना तयार करण्याची योजना आखत आहे.

(Bhagwan Parshuram Structure To Be Build in Goa)

Bhagwan Parshuram Structure To Be Build in Goa
World Turtle Day 2023 : आगोंद किनारा गजबजलेलाच, तरीही कासवांचे आगमन

गोवा हे पर्यटकांसाठीचे आवडते ठिकाण आहे. इथे येऊन पार्टी, धमाल मजामस्ती करणे अनेकांना आवडते. याबाबत पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांचा विश्वास आहे की, गोव्याचा वारसा आणि अध्यात्मिक उत्पत्ती जगासमोर सादर केल्याने गोव्याची 'पार्टी करण्याचे ठिकाण' ही प्रतिमा सुधारण्यास मदत होईल.

गोवा राज्य परशुराम भूमी म्हणून ओळखले जाते. पण काणकोण येथील परशुराम मंदिर सोडता गोव्यात भगवान परशुरामांची दुसरी कोणतीही प्रतिष्ठित वास्तू नाही. म्हणून, आम्ही धनुष्य आणि बाणांची रचना तयार करण्याची कल्पना आणली आहे.

आम्ही त्यासाठी मांद्रे हे ठिकाण निश्चित केले असून लवकरच या प्रकल्पासाठी सल्लागारांची नियुक्तीही करणार असल्याचे मंत्री खवंटे यांनी सांगितले.

आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर मांद्रे समुद्रकिनारी असलेल्या नैसर्गिक खडकांवर बांधकाम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. आराखडा तयार करण्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येईल. पर्यटन विभागाच्या अधिकारप्राप्त समितीने ही संरचना बांधण्यासाठी तत्वतः मान्यता देखील दिली आहे.

रोहन खवंटे सांगितले की, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना हरमलमध्ये पवित्र अग्निकुंड असल्यामुळे ही कल्पना सुचली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com