Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यानिमित्त वास्कोत भव्य शोभायात्रेचे आयोजन

वास्कोत हिंदू नववर्ष स्वागत समिती मुरगावतर्फे बुधवार दि. 22 मार्च रोजी श्री दामोदर मंदिराकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023Dainik Gomantak

Gudi Padwa 2023: वास्कोत हिंदू नववर्ष स्वागत समिती मुरगावतर्फे बुधवार दि. 22 मार्च रोजी श्री दामोदर मंदिराकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मुरगावातील भारतीय संस्कृतीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष साईनाथ नाईक यांनी केले आहे.

Gudi Padwa 2023
म्हापसावासियांच्या खिशाला कात्री! आता घरातील कुत्र्यांसाठीही भरावा लागणार कर; पालिकेतर्फे इतर करातही वाढ

वास्कोत सितादेल हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस उत्सव समिती अध्यक्ष साईनाथ नाईक, स्वागत समिती अध्यक्ष राजेश शिरोडकर, सचिव योगेश शेठ तानावडे, सहसचिव राजाराम पाटील, प्रसिद्धी प्रमुख समीर खुटवाळकर, सुमित्रा होळकर, सविता सातार्डेकर आदी उपस्थित होते.

ग्रामदैवत श्री दामोदर चरणी श्रीफळ ठेवून या शोभायात्रेला प्रारंभ होईल. यंदाचे मुख्य आकर्षण म्हणजे मुरगावमधील समस्त हिंदू नागरिकांच्या सहभागाने ही शोभायात्रा पारंपरिक वेशभूषा, भगवे झेंडे व दिंडीसहीत मार्गस्थ होऊन मुरगाव नगरपालिकेजवळ समाप्त होईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिल्पकार व इतिहासकार सचिन मदगे उपस्थित राहून संबोधित करतील. यावेळी त्यांच्याहस्ते हिंदू दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येईल, अशी माहिती नाईक यांनी दिली.

हिंदू नववर्ष स्वागत समिती पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

स्वागत समिती अध्यक्ष : राजेश शिरोडकर, माजी अध्यक्ष श्री रुद्रेश्वर च्यारी,

उत्सव समिती अध्यक्ष : साईनाथ नाईक,

उपाध्यक्ष : गुरूदास प. उगवेकर (महाले), विजय हजारे, दत्ता ग. आगापुरकर, भक्ती खडपकर,

संरक्षक : कृष्णराव बांदोडकर

संयोजक : नितिन फळदेसाई

सहसचिव : राजाराम पाटील

खजिनदार : आनंद गुरव

सहखजिनदार : संजय नाईक

प्रसिध्दी प्रमुख : समीर प्र. खुटवाळकर

व्यवस्था प्रमुख : मंगेश चं. तुळसकर

सदस्य : सखाराम ह. भगत, रामकृष्ण होनावरकर, दयानंद हरमलकर, सुरेश नाईक, गुरू नागवेकर, अजित कांबळी, दिपक च्यारी, ज्योती बांदोडकर, विशाखा फळदेसाई, अनुप्रिता गुरव, रीना नाईक, सुमित्रा होळकर, सविता सातार्डेकर, मेघा च्यारी, रूपा नाईक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com