Morlem: मोर्लेत होणार भव्य विकास सभा! 'पर्ये'साठी विविध प्रकल्पांची पायाभरणी; मुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांची असणार उपस्थिती

Parra Constituency Development Works: पर्ये विधानसभा मतदारसंघात विकासाची नवी दालने खुली होत असून विविध प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी मोर्ले-सत्तरी येथे ९ डिसेंबर रोजी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Pramod Sawant, Rohan Khaunte, Vishwajit Rane,  Divya Rane
Pramod Sawant, Rohan Khaunte, Vishwajit Rane, Divya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: पर्ये विधानसभा मतदारसंघात विकासाची नवी दालने खुली होत असून विविध प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी मोर्ले-सत्तरी येथे ९ डिसेंबर रोजी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या पुढाकाराने ही सभा होणार आहे. या सभेचा मुख्य उद्देश विविध प्रकल्पांबाबत राज्य सरकारचे आभार व्यक्त करणे हा आहे. पर्ये मतदारसंघातील विविध पंचायत क्षेत्रात पर्यटन, सार्वजनिक बांधकाम आणि अन्य खात्यांनी विविध प्रकल्प मंजूर केले आहेत.

त्यामुळेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत व मंत्री खंवटे यांना सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मंत्री विश्वजीत राणे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी सभेवेळी प्रमुख पाहुणे म्हणून येण्यास मान्यता दिली आहे. सभेदरम्यान तीन महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे.

वेलनेस डेस्टिनेशन सेंटर

केरी येथील अंजुणे धरण परिसरात पर्यटन खात्याच्या सहकार्याने वेलनेस डेस्टिनेशन सेंटर आणि इको-कॉटेज प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे अंजुणे धरण परिसरात पर्यटनाला चालना मिळणार आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी आकर्षक सुविधा उभारण्यात येणार असून त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

आजोबा मंदिराची दुरुस्ती व सौंदर्यीकरण

केरीतील प्रसिद्ध श्री सतेरी आजोबा मंदिराची दुरुस्ती तसेच परिसराचे सौंदर्यीकरण करून धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. भाविक आणि पर्यटकांसाठी या ठिकाणी उच्च सुविधा उभारण्यात येईल.

Pramod Sawant, Rohan Khaunte, Vishwajit Rane,  Divya Rane
Tanvi Vasta Case: 'तन्‍वी' प्रकरणात 'काही' बिल्‍डरही गाेत्‍यात येण्‍याची शक्‍यता! 'नेट बँकिंग'ची माहिती नसलेले अनेकजण झाले शिकार

मोर्ले १५ एमएलडी पाणी शुद्धीकरण प्रकल्प

मोर्ले येथे उभारला जाणारा १५ एमएलडी क्षमतेचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे सत्तरीतील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com