Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण पंचायतीचे तिस्क येथे स्थलांतर; नवीन इमारत लवकरच

Gram Panchayat Karapur : तूर्त तात्पुरत्या वास्तूत चालणार कारभार
Gram Panchayat Karapur
Gram Panchayat KarapurDainik Gomantak
Published on
Updated on

Gram Panchayat Karapur : साखळी मये मतदारसंघातील कारापूर सर्वण या पंचायतीची जुनी इमारत जमीनदोस्त करून त्याठिकाणी नवीन इमखरत उभारण्यात येणार असल्याने सध्या पंचायत कारापूर तिस्क येथील एका जुन्या वास्तूत स्थलांतर करण्यात आली आहे.

त्यामुळे नवीन इमारतीचे काम होईपर्यंत कारापूर सर्वण पंचायतीचा कारभार या तात्पुरत्या वास्तूत चालणार आहे, अशी माहिती सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांनी दिली.

कारापूर तिस्क येथील इन स्ट्रीट रेस्टॉरंटच्या समोर भाटकार राल्फ डिसोझा यांच्या मालकीच्या एका जुन्या वास्तूत पंचायत स्थलांतरीत करण्यात आली आहे. कारापूर येथे असलेल्या पंचायतीची इमारत ही सुमारे ४५ वर्षांपूर्वीची असल्याने ती जीर्ण आणि कमकुवत बनत चालली आहे.

तसेच सदर इमारत आता अपुरी पडत असल्याने ती जमीनदोस्त करून नवीन इमारत साकारण्यासाठी पंचायतीने प्रयत्न चालविले होते.

पंचायतीसाठी तात्पुरती जागा शोधत असतानाच भाटकार राल्फ डिसोझा यांनी आपली जुनी व विनावापर असलेली वास्तू पूर्णपणे मोफत पंचायतीला पंचायत कारभारासाठी दिली आहे. त्यामुळे आता पंचायतीचा कारभार कारापूर तिस्क येथे चालेल, असे सरपंच खारकांडे यांनी सांगितले.

९० लाखाच्या बांधकामाचे कार्यादेश जारी

पंचायत मंडळाच्या प्रयत्नांना आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या सहकार्याने यश आले. या सुमारे ९० लाख रूपये खर्चून साकारल्या जाणाऱ्या नवीन इमारतीची निविदा प्रक्रिया होऊन वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे.

त्यामुळे लवकरच सदर जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी या इमारतीतील पंचायतीचे दस्ताऐवज व इतर सामान स्थलांतरीत करणे आवश्यक होते.

Gram Panchayat Karapur
Influencers In Goa: एन्फ्लुएन्सर्सना मिळाला राजाश्रय; आता वर्षाकाठी मिळणार कोट्यावधी रुपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com