मोले येथे बेकायदेशीर चिरे खाण प्रकरणात माजी जिल्हा पंचायत सदस्य वाता गोविंद गावकर यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने गावकर यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
(Govind Gawkar arrested in illegal red stone mining case at Mollem )
अटकेची कारवाई फोंडा पोलीसांनी केली असून न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचं फोंडा पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच पुढील कारवाई न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे केली जाईल असे ही पोलिसांनी सांगितले आहे.
सविस्त वृत्त असे की, 25 जूलै रोजी मोले धारबांदोरा गावातील मालमत्ता सर्वेक्षण क्रमांक 33/1 मधील चिऱ्यांच्या बेकायदेशीर उत्खननाबाबत माजी जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर याच्यावर कारावाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पणजी येथील सहाय्यक भूवैज्ञानिक विभागाचे जितेंद्र वेळुस्कर यांनी तक्रार केली होती. यावरुन केली आहे. आरोपी गोविंद गावकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सत्र न्यायालयाने आज 08.ऑगस्ट रोजी जामीन अर्ज फेटाळला यामूळेच ही कारवाई करण्यात आली आहे.
Goa Covid Update: कोरोनाचे नवे 94 रुग्ण
राज्यात आज रविवारी 939 कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 94 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 76 जण कोरोनामुक्त झालेत. सध्या राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 911 इतकी झाली आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे कोनाचाही बळी गेला नसल्याने बळींचा आकडा 3955 कायम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.