Kala Academy: कला अकादमीचा नवा मंच पाहतील तेव्हा त्यांना 'शाह जहान'चा 'ताजमहाल' दिसेल!

यंदाच्या 54व्या इफ्फीसाठी अकादमीचा नवा मंच खुला होणार आहे
Govind Gaude slams vijai sardesai over Kala Academy
Govind Gaude slams vijai sardesai over Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

Govind Gaude slams vijai sardesai over Kala Academy

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 10 नोव्हेंबरला कला अकादमीचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे यंदाच्या 54व्या इफ्फीसाठी अकादमीचा नवा मंच खुला होणार आहे. यावरून मंत्री गावडेंनी विजय सरदेसाईंवर खरमरीत टीका केली आहे.

Govind Gaude slams vijai sardesai over Kala Academy
फेरीबोट शुल्क, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, कला अकादमी, इफ्फीबाबत अपडेट; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

जुलै 2023 मध्ये कला अकादमीच्या खुल्या मंचाचा स्लॅब कोसळला होता. यानंतर सरकारच्या आणि मंत्री गावडेंच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावेळी शाह जहानचा ताजमहाल कोसळला, असे म्हणत विजय सरदेसाईंनी गावडेंवर उपहासात्मक टीका केली होती.

खुला मंच उभारण्याच्या कामात गावडेंनी घोटाळा केला असल्याचे आरोपही करण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला.

कला अकादमीचा नवा मंच पाहतील तेव्हा त्यांना 'शाह जहान'चा 'ताजमहाल' दिसेल!

आता अधिकृतरित्या कला अकादमी खुली होणार असून इफ्फीसाठी अकादमी वापरण्यात येणार आहे. यावरून गोविंद गावडेंनी विजय सरदेसाईंवर पलटवार केला आहे.

स्लॅब कोसळण्याच्या घटनेवरून गावडे म्हणाले की, 'जेव्हा ते सभागृहात बसतील आणि मी काय केले ते पाहतील तेव्हा त्यांना कळेल. तेव्हा त्यांना 'शाह जहान'चा 'ताजमहाल' दिसेल!

खरंतर त्यांनी माझ्यावर टीका केली हे एका अर्थाने चांगलेच झाले. कारण त्यांच्या टिकेमुळे मला प्रसिद्धी मिळाली.

कला अकादमी पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर 54 व्या इफ्फीचा भाग म्हणून मास्टरक्लास आणि इन-कॉन्वरसेशन सत्रांचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गावडेंनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com