Govind Gaude : म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे गुरुवारी लोकार्पण

फोंडा पोलिस स्थानकावरील भार कमी करणे आणि प्रियोळ लगतच्या भागातील गावांना चांगली सेवा देण्याच्या हेतूने या स्थानकाची निर्मिती
Govind Gaude
Govind Gaude Gomantak Digital Team
Published on
Updated on

म्हार्दोळ पोलिस स्थानकाचे गुरुवारी (ता. ८) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल, अशी माहिती प्रियोळ मतदारसंघाचे आमदार तथा कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी दिली. फोंडा पोलिस स्थानकावरील भार कमी करणे आणि प्रियोळ लगतच्या भागातील गावांना चांगली सेवा देण्याच्या हेतूने या स्थानकाची निर्मिती केल्याचे गावडे म्हणाले.

म्हार्दोळ बाजार परिसरालगत उभारण्यात आलेल्या व सुविधांनी युक्त म्हार्दोळ पोलिस स्थानकाला स्वतंत्र पोलिस निरीक्षक व इतर कर्मचारी वर्ग देण्यात येणार आहे. या पोलिस स्थानकाचा उपअधीक्षक मात्र फोंड्यातीलच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी या स्थानकाच्या कामाला चालना दिली आणि आता विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे पोलिस स्थानक पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले, त्यामुळे म्हार्दोळ पोलिस स्थानक साकारले असल्याचे गावडे म्हणाले.

Govind Gaude
Goa Engineer Mega Recruitment: नोकर भरती नव्हे, विक्री! इंजिनिअर मेगा भरतीचा तिढा सुटेना; युवक काँग्रेस आक्रमक

फोंडा पोलिस स्थानकावर उसगाव ते पंचवाडी आणि माशेल ते वळवई अशा दूरच्या भागावर नियंत्रण ठेवावे लागत आहे, त्यातच पोलिसांना आपत्कालीन वेळेला धाव घ्यावी लागत असल्याने तसेच परिसर लांबचा असल्याने त्रासदायक ठरत होते, त्यामुळेच म्हार्दोळ पोलिस स्थानक उभारले आणि आता त्याचे लोकार्पण केले जात आहे.

Govind Gaude
Panji Traffic Issue: खंडपीठाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वेच्छा दखल

अधिकार क्षेत्रातील गावे

म्हार्दोळ पोलिस स्थानकात अडकोण, बेतकी, भोम, खांडोळा, कुंकळ्ये, वरगाव, केरी, सावईवेरे, तिवरे, वेलिंग, वळवई, वाघुर्मे, माशेल, प्रियोळ, म्हार्दोळ, कुंडई औद्योगिक वसाहत तसेच मडकईतील औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. प्रियोळ मतदारसंघातील सर्व पंचायतींचा या पोलिस स्थानकात समावेश करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com