कोकणीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणार - राज्यपाल

गोवा विद्यापीठाचे चार राज्यांमध्ये कोकणी शिक्षण केंद्रे सुरू करणार - राज्यपाल
konkani language
konkani languageDainik Gomantak

वास्को: मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करताना, राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले की त्यांनी गोवा विद्यापीठाला चार राज्यांमध्ये कोकणी शिक्षण केंद्रे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मुरगाव तालुक्यातील सात पंचायतींच्या सरपंच व पंच सदस्यांच्या भेटीदाखल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई एक दिवसाच्या मुरगाव तालुक्यातील पंचायत दौऱ्यावर होते. यावेळी चिखली पंचायत सभागृहात तसेच उपासनगर - सांकवाळ येथे कला भवन येथे आयोजित सरपंच व पंच सदस्यांबरोबर घेतलेल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

(Governor PS Sreedharan Pillai directed Goa University to start Konkani education centers in four states )

मातृभाषेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे आणि कोकणी भाषेच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे राज्यपाल श्रीधर पिल्लई यांनी सांगितले. देशात चार राज्यात कोकणी भाषेचा प्रभाव आहे. कोकणी ही गोव्याची मातृभाषा आहे. त्याचा मी आदर करतो, असे ते म्हणाले. पंचायत निवडणुकीनंतर तसेच मतमोजणीनंतर मी पुन्हा एकदा गोवा भ्रंमती चालू केली असून देवाला वाटले, तर सहा महिन्यांत गावे आणि पंचायतींना भेटी देईन, असे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कुठ्ठाळीचे आमदार अंतोनियो वाझ यांनी कोकणी भाषेतून भाषण केल्याबद्दल राज्यपालांची स्तुती केली.

konkani language
Ganesh Chaturthi 2022: जाणून घ्या, गोव्यातील गणेश स्थापनेसाठी तारीख, वेळ, कथा आणि शुभ मुहूर्त

पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले की, "केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथे मोठ्या लोकसंख्येची मातृभाषा कोकणी आहे. हे लक्षात घेऊन आणि गोवा विद्यापीठाचा चॅनल सेलर म्हणून मी या चार राज्यांमध्ये कोकणी शिक्षण केंद्रे सुरू करण्याचे निर्देश गोवा विद्यापीठाला दिले आहेत. कोचीन आणि मेंगलोर येथे लवकरच केंद्रे सुरू केली जातील,” असे ते म्हणाले.

konkani language
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर डिचोलीतील वाहतूकीत बदल

"संविधानानुसार मातृभाषेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे आणि मी कोकणी भाषेच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. "कोकणी ही प्राचीन आणि अतिशय सुंदर भाषा आहे आणि तिचा प्रचार करणे ही काळाची गरज आहे असे," पिल्लई म्हणाले. कुठ्ठाळीचे आमदार अंतोनियो वाझ यांच्या उपस्थितीत कुठ्ठाळी मतदारसंघातील पाच पंचायत मंडळांच्या पंच आणि सरपंचांशी संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.

लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा करताना कौटुंबिक संबंध बाजूला ठेवण्याचे आवाहनही पिल्लई यांनी राजकीय नेत्यांना केले.सार्वजनिक कामाच्या नावाखाली सर्व प्रकारची संपत्ती एकत्र करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. जर परवानगी दिली तर मी येत्या सहा महिन्यांत सर्व पंचायतींचा दौरा पूर्ण करेन आणि आपल्या संपूर्ण यंत्रणेसाठी हे एक उत्कृष्ट उदाहरण असेल. आपण लोकांना भेट दिली पाहिजे कारण लोकशाहीत लोक सर्वोच्च आहेत, ”पिल्लई म्हणाले.

यावेळी राज्यपाल पिल्लई त्यांच्या समवेत चिखली पंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, चिखलीचे सरपंच कमला प्रसाद यादव, सरपंच संकल्प महाले होते. तर सांकवाळ उपासनगर येथे कलाभवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या समवेत व्यासपीठावर कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वास, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, तसेच वेळसाव, कासावली, कुठ्ठाळी, सांकवाळ, केळशी पंचायतीचे पंच सरपंच आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com