'विकास' म्हणजे गाव सोडून शहरात जाणे नव्हे..!

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे भूमीपुत्रांना आवाहन..
Governor of Himachal Pradesh  Rajendra Arlekar
Governor of Himachal Pradesh Rajendra ArlekarDainik Gomantak

काणकोण व पेडणे हे मागासलेले तालुके हा शिक्का पुसण्याचे कार्य येथील भूमीपुत्रांनीच करायला हवे, असे मत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांनी आज आदर्श युवा संघ व बलराम शिक्षण संस्थेने कला व संस्कृती तसेच अन्य संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘लोकोत्सव - 2021’ या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.

Governor of Himachal Pradesh  Rajendra Arlekar
भाजप पूर्वी तत्त्वांचे राजकारण करत होता; आता 'सत्तेचे राजकारण' करत आहे...

विकास (Progress) म्हणजे गाव सोडून शहरात जाणे नव्हे, गावातील रहिवाशांना गावातच सधन होण्याचा मंत्र द्यायला हवा. त्याचवेळी देश प्रगतिपथावर जाणार आहे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आयुष्य मंत्रालयाच्या (Ministry of Ayush) आयुर्वेदिक वनस्पती लागवड योजनेतून शेतकरी सधन होऊ शकतात. आजपर्यंत वनांतील औषधी वनस्पतीची तोड करण्यात येत आहे. जगातील वेगवेगळे देश भारताकडे आयुर्वेदिक औषध प्रणालीसाठी अपेक्षेने पाहत आहेत. भविष्यकाळात ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आतापासूनच प्रयत्नांची गरज आहे. कोरोना महामारी काळात आयुष्य मंत्रालयाने जगातील 150 देशांना कोरोना (Corona) प्रतिबंधक आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा केला, असे सांगितले.

यावेळी राज्यभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या पंचेचाळीस मान्यवरांचा राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com