Vasco:लोकसेवेची ऑफर स्वीकारा, राज्यपालांचा पंच सदस्यांना सल्ला

Vasco:लोकसेवेची ऑफर स्वीकारा, राज्यपालांचा पंच सदस्यांना सल्ला

'लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी असून लोक सर्वोच्च आहेत. लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. संविधानात लोक सर्वोच्च आहेत. सदैव तत्पर राहून लोकांनी दिलेली सेवेची ऑफर स्वीकारा,' असा सल्ला गोवा राज्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीतील निवडून आलेल्या नवनिर्वाचित पंच सदस्यांना दिला.

मुरगाव तालुक्यातील सात पंचायतींच्या सरपंच व पंच सदस्यांच्या भेटी दाखल राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई आज एक दिवसाच्या मुरगाव तालुक्यातील पंचायत दौऱ्यावर होते. यावेळी चिखली पंचायत सभागृहात तसेच उपास नगर साकवाळ येथे कला भवन आयोजित सरपंच व पंच सदस्यांच्या बरोबर वार्तालाप कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी ते उपस्थित नवनिर्वाचित पंच सदस्यांना संबोधित करताना बोलत होते.

यावेळी राज्यपाल पिल्लई यांनी मुरगाव तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात साकवाळ येथील शांतादुर्गा मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर त्यांनी बोगमाळो येथे चर्चमध्ये भेट देऊन आशीर्वाद घेतले. नंतर पंचायतीला भेट दिल्यानंतर चिखली पंचायतीला भेट दिली. या ठिकाणी चिखली पंचायत सभागृहात त्याने चिखली पंचायतीच्या पंच सदस्यांना आयोजित वार्तालाप कार्यक्रमात संबोधित केले.

Vasco:लोकसेवेची ऑफर स्वीकारा, राज्यपालांचा पंच सदस्यांना सल्ला
Sonali Phogat: 'पीएनेच केला अत्याचार अन् खून', सोनाली फोगाट कुटुंबियांचे गंभीर आरोप

यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, चिखली पंचायतीचे सरपंच कमला प्रसाद यादव, पंचायतीच सरपंच संकल्प महाले तसेच राज्यपालांचे स्वीस सचिव उपस्थित होते. सरपंच कमला प्रसाद यादव व सरपंच संकल्प महाले यांनी आपले विचार मांडले. तसेच पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनीही आपले विचार मांडून चिखली पंचायत गोव्यात अव्वल स्थानावर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी राज्यपालाकडून सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यपालांनी यावेळी गोवा शिपयार्डचा दौरा करून तेथील सीपयार्डची पाहणी केली व गोवा शिप्याचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी वार्तालाप केला तसेच भोजन केले. दरम्यान संध्याकाळच्या सत्रात राज्यपाल श्रीधरण पिल्लई यांनी उपास नगर साकवाळ येथील कलाभवन सभागृहात सांकवळ, कुठ्ठाळी, केळशी कासावली, वेलसाव पंचायतीच्या सरपंच, पंच सदस्य अशी वार्तालाप केला.

Vasco:लोकसेवेची ऑफर स्वीकारा, राज्यपालांचा पंच सदस्यांना सल्ला
गोवा पोलिसांची मोठी कारवाई, Sonali Phogat मृत्यूप्रकरणी पीए सुधीर सागवानला अटक

यावेळी त्यांनी आपल्या लोकांची सेवा करताना गावाची सौदर्यता सांभाळण्याचा सल्ला दिला. लोकांनी निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी असून समाजाप्रती कार्य करण्यास झोकून घ्यावे. आपण लोकांचे नोकर असून सर्वप्रथम गावच्या लोकांची सेवा करावी. गोव्याची परंपरा श्रीमंतीची असून येथील लोक सर्वोच्च असल्याचे सांगताना आपला भारत देश रत्नगर्भ आहे असे ते म्हणाले. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकसेवेस कोणत्याच प्रकारची कमतरता भासू देऊ नये असा सल्ला त्यांनी उपस्थित पंच सदस्यांना दिला.

कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर, गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक तसेच चिखली पंचायत सचिव अमृत साखळकर उपस्थित होते. यावेळी चिखलीतील कार्यक्रमात 19 रुग्णांना राज्यपाल निधीतून उपचारासाठी 25 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. उपासनगर साकवाळ कार्यक्रमात व्यासपीठावर कुठ्ठाळीचे आमदार आतोन वास व पाचही पंचायतीतील सरपंच व पंच सदस्य उपस्थित होते.

Vasco:लोकसेवेची ऑफर स्वीकारा, राज्यपालांचा पंच सदस्यांना सल्ला
Durand Cup Football: एफसी गोवा बाद फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com