Dhavali Land Acquisition: स्थानिक गरिबांच्या जमिनींवर डोळा!

Dhavali Land Acquisition: ढवळी-बाेरी येथील चौपदरी रस्ताकामातील प्रकार, गावडे कुटुंबाचा जमीन संपादनास विरोध
Dhavali Borim Land Acquisition
Dhavali Borim Land Acquisition Dainik Gomantak
Published on
Updated on

Dhavali Land Acquisition: बोरी पुलाच्या जोडरस्त्यासाठी ढवळी येथील चौपदरी रस्ताकामात स्थानिक गरिबांच्या जमिनींवर सरकारचा डोळा आहे. गरजेपेक्षा जास्‍त जमीन संपादन करताना काही मालकांना अंधारात ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका जमीनमालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

रस्‍त्‍याच्‍या कामासाठी ढवळी येथील तुकाराम केळू गावडे कुटुंबीयांची गरजेपेक्षा जास्त जमीन संपादन करण्याचा प्रकार घडला आहे. आज बुधवारी सार्वजनिक बांधकाम खात्याने या जमिनीचे सर्वेक्षण करताना दगडाने सीमारेषा आखण्‍याच्‍या प्रकाराला गावडे कुटुंबीयांनी विरोध केला. विशेष म्हणजे या सीमा आरेखनासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तुकाराम गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना आपले घर पाडले जाण्‍याची भीती व्यक्त केली. सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी पोलिसांसमवेत आले असता गावडे कुटुंबीयांनी त्‍यांना विरोध केला. यावेळी सरकारी राजपत्रात यासंबंधी माहिती प्रसिद्ध झाल्याचे या खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र गावडे कुटुंबीयांना कोणत्याच प्रकारची माहिती देण्‍यात आली नाही.

वास्तविक रस्त्याच्या मध्यभागापासून जमीन संपादन केल्यास गावडे कुटुंबाचे घर वाचू शकते, पण तसे न करता खात्याने जमीन संपादनासाठी गावडे कुटुंबाच्‍या जमिनीचा जास्तीत जास्त भाग व्यापला आहे. तेथे एक नैसर्गिक नाला आहे. तोही बुजण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घालून आम्‍हाला न्‍याय द्यावा, अशी मागणी तुकाराम गावडे यांनी केली आहे.

‘ती’ इमारत वाचवण्याचा खटाटोप

रस्त्यासाठी जमीन संपादन करताना ढवळी येथील एक इमारत वाचवण्यासाठी गावडे कुटुंबाची जास्तीत जास्त जमीन संपादन करण्याचा प्रयत्न करण्‍यात आला आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून जमीन संपादन केल्यास ही इमारत पाडावी लागणार आहे. त्यामुळे ती वाचवण्यासाठीच आमची आवश्‍‍यकतेपेक्षा अधिक जमीन सरकारी यंत्रणेने संपादन करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा गावडे कुटुंबीयांनी केला आहे.

Dhavali Borim Land Acquisition
Family System: कुटुंब व्यवस्थेचे, मूल्यांचे रक्षण व्हावे

तुकाराम गावडे, जमीनमालक (ढवळी)

ढवळी येथील मलनि:स्सारण प्रकल्पासाठी आमची शेतजमीन वापरली गेली, पण सरकारने दिलेली आश्‍वासने काही पाळली नाहीत. आता पुन्‍हा एकदा आमची जमीन बळकावण्याचा प्रयत्‍न होत आहे. वास्तविक ही जमीन न घेताच काम करण्‍याचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र तो अवलंबण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com