National Games Goa 2023: गोवा मुक्तीनंतर प्रथमच राज्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी...

National Games Goa 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : पंतप्रधानांच्या हस्ते सायंकाळी उद्‍घाटन
National Games Goa 2023
National Games Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

National Games Goa 2023: मुक्तीनंतर प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळालेल्या गोव्याने या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कसर सोडलेली नाही. फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणारा उद्‍घाटन सोहळा संस्मरणीय व्हावा, यासाठी सरकारने कठोर मेहनत घेतली आहे.

National Games Goa 2023
Subhash Phaldesai: मोबाईलचे दुष्परिणाम ओळखाः सुभाष फळदेसाई

आज (बुधवारी) तेथे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या समक्ष उद्‍घाटन सोहळ्यातील कार्यक्रमांची सवेश तालीम घेण्यात आली. सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तयारीचा आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी येथून खास विमानाने सायंकाळी सहा वाजता दाबोळी येथील हंस नौदल तळावर दाखल होणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे सात हजार कोटी रुपयांच्या विकास कामांची सुरुवात मोदी हस्ते होणार आहे. त्यांच्याच हस्ते गोव्यात सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून होईल.

National Games Goa 2023
Goa Assembly Election: फोंड्यात विधानसभा निवडणुकीचे नियोजन सुरू

गेली 12 वर्षे या स्पर्धेची राज्याला प्रतीक्षा आहे. राज्याने लुसोफोनिया स्पर्धेचेही यशस्वी आयोजन केले होते. मात्र, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी राज्याला अद्याप मिळाली नव्हती. या स्पर्धेच्या आयोजनावर यंदा सरकार ठाम होते. अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतर आर्थिक मदतीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली होती.

दिमाखदार सोहळा

गुरुवारी पंतप्रधानांसमोर तब्बल सहाशे कलाकारांच्या सहभागाने राष्ट्रीय एकात्मता संकल्पनेवर आधारीत कलात्मक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. प्रसिद्ध गोमंतकीय गायिका हेमा सरदेसाई आणि सुखविंदरसिंग यांचा सांगितीक कार्यक्रमही यावेळी सादर केला जाणार आहे. जागतिक पातळीवरील गोमंतकीय विंडसर्फर कात्या कुएल्हो ही क्रीडा मशाल पंतप्रधानांकडे सुपूर्द करणार आहे. स्टेडियममध्ये दुपारी ४ वाजल्यापासून करमणुकीच्या कार्यक्रमांना सुरवात होईल. पंतप्रधान स्टेडियममधून निघाल्यानंतरही हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत.

माहितीपुस्तिका

खेळाडूंना गैरसोयी जाणवू नयेत, यासाठी एक माहिती पुस्तिका सरकारने तयार केली आहे. खेळाडूंची राहण्याची, जेवणाची व्यवस्था कुठे आहे, वाहतुकीची व्यवस्था कशी असेल, याची माहिती पुस्तिकेत दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधून मिळवता येईल. शिवाय कोणत्याही व्यवस्थेबाबत तक्रार असल्यास कोणाशी संपर्क साधावा, याची माहितीही या पुस्तिकेत दिली आहे. प्रत्येक राज्यासाठी नेमलेल्या संपर्क अधिकाऱ्याचे नाव आणि मोबाईल क्रमांकही त्यात नमूद केला आहे.

आनंद, गेल यजमान संघाचे ध्वजधारक : आंतरराष्ट्रीय पुरुष तायक्वांदो पी. आनंद आणि अमेरिकास्थित आंतरराष्ट्रीय गोमंतकीय रोईंग खेळाडू गेल मिरांडा हे उदघाटन सोहळ्यात गोव्याचे ध्वजधारक असतील. एकूण 18 खेळाडू आणि दोघे अधिकारी उदघाटन संचलनात भाग घेतील.

  • या ठिकाणी खेळाडूंचे स्वागत

  • मडगाव रेल्वे स्थानक

  • वास्को रेल्वे स्थानक

  • करमळी रेल्वे स्थानक

  • थिवी रेल्वे स्थानक

  • मडगाव बस स्थानक

  • पणजी बस स्थानक

  • म्हापसा बस स्थानक

  • मोपा विमानतळ

  • दाबोळी विमानतळ

  • मोले येथील सीमा

  • पोळे येथील सीमा

  • पत्रादेवी येथील सीमा

  • केरी येथील सीमा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com