फोंडा: मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प अद्याप कार्यान्वित नसतानाही अनेक गटारांचे चेंबर कोसळले आहे. यामुळे नागरिकांमध्ये गटारांच्या कामाच्या दर्जाबाबत चिंता निर्माण झाली आहे. फार्मगुडी-ढवळी या राष्ट्रीय महामार्गावरील एक नुकताच खड्डा पडला आहे.
(Government should investigate quality of sewage treatment plant, demand ponda locals)
परंतु सतर्क स्थानिकांनी PWD अधिकार्यांना माहिती दिली, दरम्यान स्थानिकांनी वेळीच बॅरिकेड लावले यामुळे अपघात होण्यापासून टाळता आले.
“विशेषत: पावसाळ्यात, रस्त्यांवर खड्डे पडण्याचा आणि चेंबर्स अचानक ओसंडून वाहण्याच्या घटना वाढु लागल्या आहेत, तसेच सेप्टिक कचरा रस्त्यावर पसरला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत, आणि फोंडा तालुक्यातील संपूर्ण मलनिस्सारणच्या कामाचा दर्जा तपासावा,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विराज सप्रे यांनी केली. बहुतांश गटार हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप त्यांनी केला. 2016 पासून तालुक्यात 15 एमएलडी एसटीपीचे काम सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.