Goa Municipality: पणजी महापालिकेने आठवड्यात जमविला '38' लाखांचा महसूल

Goa Municipality: वसुली मोहीम धडकपणे राबविण्याचे महापालिकेने निश्‍चित केले आहे.
Goa Panjim Municipality
Goa Panjim MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Municipality: महापालिकेची घरपट्टी, व्यापार परवाना नूतनीकरण, भाडे, सोपो अशा विविध करापोटी 35 कोटी रुपये येणे थकित आहे. त्यामुळे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आला होता.

त्यामुळे वसुली मोहीम धडकपणे राबविण्याचे महापालिकेने निश्‍चित केले असले तरी दिवाळी सण आल्याने ही मोहीम कडकपणे राबविण्यात सौम्यपणा आला आहे. तरीही आठवड्यात महापालिकेच्या तिजोरीत 38 लाखांचा महसूल जमा झाला आहे.

Goa Panjim Municipality
Goa Tourism: पर्यटकांसाठी मोफत बससेवा लवकरच सुरु होणार- रोहन खंवटे

महापालिकेने सध्या आयुक्त आग्नेलो फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली थकित 35 कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार महारपालिकेचे लेखा तथा करअधिकारी सिद्धेश नाईक यांनी वसुलीसाठी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

आठवडाभरात महापालिकेच्या तिजोरीत 38 लाख 53 हजार 74 रुपये महसूल जमा झाला असल्याची माहिती नाईक यांनी दिली. पणजी शहारातील सकारी कार्यालये, केंद्रीय कार्यालये, खासगी आस्थापने व मोठमोठ्या व्यवसायिकांकडून घरपट्टी येणे बाकी आहे. अनेकांची घरपट्टी काही कोटींमध्ये आहे.

Goa Panjim Municipality
Goa Petrol Price: या राज्यात पेट्रोल-डिझेल महागले जाणून घ्या, गोव्यातील इंधनाचे दर

पर्यटन खाते व टपाल खात्याचेही साधारण लाखो रुपयांचे येणे बाकी आहे. महापालिकेने थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या असून, दिवाळीचा सण झाल्यानंतर ही वसुली मोहीम अधिक कडकपद्धतीने राबविली जाईल, असे नाईक यांनी सांगितले.

मोहिम तीव्र करणार

महापालिकेने ज्या व्यावसायिकांना नोटिसा पाठविल्या आहेत, त्यातील काही लोक येऊन आपली थकबाकी रक्कम भरत आहेत. तर काहीजण नोटिसांकडे दुर्लक्षही करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच महापालिकेला वसुली पथकांची नेमणूक करावी लागली आहे. दिवाळी सणानंतर ही वसुली मोहीम गती घेईल, असे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com