Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Bhuimpal Sattari school : शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवर्ग यंदा पौराणिक तथा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेले तामिळनाडूतील ‘रामसेतू’वर संशोधन करण्यासाठी धनुषकोडीकडे रवाना झाले.
Bhuimpal Sattari school research
Bhuimpal Sattari school researchDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सरकारी माध्यमिक विद्यालय भुईपाल-सत्तरी या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवर्ग यंदा पौराणिक तथा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेले तामिळनाडूतील ‘रामसेतू’वर संशोधन करण्यासाठी धनुषकोडीकडे रवाना झाले.

शिक्षण खाते, समाज कल्याण खाते यांच्या संयुक्त सहकार्याने तथा प्रशिक्षण यात्रा उपक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे.

मुख्याध्यापिका मोनाली नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तथा शिक्षक तुळशीदास पर्येकर, शिक्षक सिद्धेश गावस, शिक्षिका सरिता माजीक यांच्या साथीने एकूण ४३ विद्यार्थी या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

हा अभ्यास दौरा एकूण आठ दिवस आहे. या अभ्यास दौऱ्यात श्री मिनाक्षी मंदिर, श्री रामेश्वर मंदिर, डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे निवासस्थान, म्युझियमला विद्यार्थी भेट देणारआहेत.

या संशोधन काळात विद्यार्थी व शिक्षक रामसेतू निर्मितीसाठी कोणकोणत्या साहित्याचा वापर केला. रामायणातील नर व निल यांनी रामसेतूचा मार्ग व आखणी याची रचना कशा प्रकारे केली.

Bhuimpal Sattari school research
Ram Temple Film: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

धनुष्य कोडी ते तलाईमन्नार (श्रीलंका) यामधील अंतर, रामसेतूची एकूण लांबी, रुंदी, रामसेतूसाठी जे विशिष्ट प्रकारचे दगड वापरले गेले, त्याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करण्यात येणार आहे. तसेच आता रामसेतूचा किती टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. किती टक्के भाग पाण्यावर दिसतो यांचा अभ्यास मान्यवर तज्ज्ञांच्या मदतीने विद्यार्थी करणार आहेत.

Bhuimpal Sattari school research
Ram Setu: रामसेतूचे ठोस पुरावे नाहीत; सरकारची संसदेत माहिती...

कन्याकुमारी दर्शन

या अभ्यास दौऱ्यात रामसेतू येथील शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर पंचमुखी हनुमान, पंबन रेल्वे पूल, कोटीतिर्थ येथे भेट दिल्यानंतर रेल्वे मार्गाने कन्याकुमारीला विद्यार्थी जाणार आहेत. त्यानंतर केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर, तिरुवनंतपुरम प्राणी संग्रहालयाला विद्यार्थी भेट देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com