साकवाळ येथील सरकारी प्राथमिक शाळा चार वर्षापासून 'भग्नावस्थेत'

शाळेचा संपूर्ण परिसर झाडाझुडपांनी वाढलेला असल्याने अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांना यापासून धोका निर्माण झाला आहे.
Dabolim शिंदोळी साकवाळ येथे भग्नावस्थेत असलेली सरकारी शाळा इमारत.
Dabolim शिंदोळी साकवाळ येथे भग्नावस्थेत असलेली सरकारी शाळा इमारत.Dainik Goamantak
Published on
Updated on

दाबोळी: साकवाळ पंचायत क्षेत्रातील शिंदोळी येथील सरकारी प्राथमिक शाळा (school) चार वर्षापासून विद्यार्थी नसल्याने भग्नावस्थेत पडून आहे. शाळेचा संपूर्ण परिसर झाडाझुडपांनी वाढलेला असल्याने अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांना यापासून धोका निर्माण झाला आहे. शाळेचा उपयोग फक्त निवडणुकीपुरतीच होत आहे.

Dabolim शिंदोळी साकवाळ येथे भग्नावस्थेत असलेली सरकारी शाळा इमारत.
गोव्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक सहभाग कार्यक्रमाचे केले आयोजन
शिंदोळी साकवाळ येथे भग्नावस्थेत असलेली सरकारी शाळा इमारत.
शिंदोळी साकवाळ येथे भग्नावस्थेत असलेली सरकारी शाळा इमारत.Dainik Goamantak

मुरगाव तालुक्यातील साकवाळ शिंदोळी गावात असलेली सरकारी प्राथमिक शाळा विद्यार्थी नसल्यामुळे बंद स्थितीत असून शाळेच्या इमारतीची भग्नावस्था झाली आहे. इमारतीचा ताबा शिक्षण खात्याकडे असून सुद्धा या इमारतीची दुरुस्ती, परिसर स्वच्छ ठेवणे आदी गोष्टीवर नियंत्रण ठेवणे सरकारची जबाबदारी आहे. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे इमारतची दुर्दशा झालेली पाहण्यास मिळते. सध्या या शाळेच्या इमारतीला झाडे, वेलीनी वेढलेली आहे. त्यामुळे हा शाळेचा परिसर जंगलमय झाला आहे. या इमारतीच्या बाजूलाच लहान मुलांसाठी अंगणवाडी असून या अंगणवाडीत लहान मुलांची ये-जा असते. मात्र इमारती सभोवताली झाडाझुडपामुळे या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात यांनी नुकतीच या भागाला भेट देऊन या शाळेच्या इमारतीची पाहणी केली असता सत्य परिस्थिती तिच्या लक्षात आली. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की सदर शाळेच्या इमारतीची स्थिती भयावह झाली असून सरकारने या शाळेकडे लक्ष पुरवून आवश्यक ती डागडुजी करावी.

Dabolim शिंदोळी साकवाळ येथे भग्नावस्थेत असलेली सरकारी शाळा इमारत.
आधी ह्रदयविकाराचा झटका आणि अपघाताने घातला काळाचा घाला

मी जिल्हा पंचायत सदस्य या नात्याने या विषयी सरकारदरबारी या शाळे विषयी विषय मांडून माझ्या परीने लक्ष पुरविणार असल्याचे त्या म्हणाल्या. या शाळेची डागडुजी करून महिला मंडळ तसेच स्वयंसहाय्य गटांना उपयोगात आणण्यास माझा प्रयत्न असेल असे शेवटी थोरात यांनी सांगितले.

येथील एक नागरिक गिरीश बोरकर यांनी सदर शाळेचा उपयोग फक्त निवडणुकीपूर्तीच होत असतो. मग ही शाळा धूळखात पडते. त्यामुळे शाळेची भग्नावस्था झाल्याचे ते म्हणाले. आता निवडणूक जवळ आली आहे. तेव्हा निवडणूक कामासाठी सदर शाळेचा उपयोग करणार आहे. मात्र सध्याची शाळेची परिस्थिती पाहिल्यास निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी शाळेचे वर्ग राहण्यायोग्य नसल्याने दृष्टीपथास पडत आहे. तसेच शाळेचे शौचालय एकदम घाणेरडे अवस्थेत आहे. तसेच या शाळेशेजारी वाढलेल्या झाडा झुडपामुळे येथील अंगणवाडी येणाऱ्या लहान मुलांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. तेव्हा सरकारने याविषयी जातीने लक्ष घालून शाळेला नवजीवन द्यावे जेणेकरून या गावातील मुलांना याचा फायदा होईल. तसेच एखाद्या महिला मंडळ किंवा स्वयंसहाय्य गटांना सदर शाळा इमारत उपयोगात आणण्यास घ्यावी असेही त्याने यावेळी सुचवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com