Honda IDC: उग्र वास, दूषित पाणी, धूर...होंडा औद्योगिक वसाहतीत प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त

Honda IDC Pollution: होंडा औद्योगिक वसाहतीत वाढते प्रदूषणाची दखल घेत होंडा पंचायत मंडळासह आरोग्य, जलस्रोत व अन्य सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वसाहतीतील एका कारखान्याची सोमवारी संयुक्त पाहणी केली. यावेळी या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून आले.
Honda IDC Pollution Inspection
Honda IDC PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Honda IDC Pollution

पिसुर्ले: होंडा औद्योगिक वसाहतीत वाढते प्रदूषणाची दखल घेत होंडा पंचायत मंडळासह आरोग्य, जलस्रोत व अन्य सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वसाहतीतील एका कारखान्याची सोमवारी संयुक्त पाहणी केली. यावेळी या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून आले.

होंडा औद्योगिक वसाहतीची स्थापना सुमारे ४० वर्षांपूर्वी करण्यात आली. सुरवातीला या ठिकाणी प्रदूषण विरहित कारखाने उभारण्यास सरकारने प्राधान्य दिले. परंतु गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या वाढली आहे. उग्र वास, दूषित पाणी, धूर आदी समस्या उग्र झाल्या आहेत. याचा प्रचंड त्रास या औद्योगिक वसाहतीच्या आसपास असलेल्या लोकवस्त्यांना होत आहे.

होंडा पंचायतीच्या भुईपाल प्रभागातील चोडणकरनगर, पोस्तवाडा, गावकरवाडा या भागातील नागरिकांना याचा मोठ्या फटका बसत आहे. याबाबत नागरिकांनी पंचामार्फत पंचायतीत तक्रार दाखल केली होती. तसेच आमदार डॉ. दिव्या राणे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला होता. आमदार राणे यांनी संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली, असे पंच स्मिता मोटे यांनी सांगितले.

या पथकाने औद्योगिक वसाहतीतील सुक्राप्ट या कारखान्याला भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी उघड्यावर सोडले जात असल्याचे दिसून आले. तसेच कामगारांचे कॅटिन व निवासी गाळ्यांच्या सभोवती असुरक्षित वातावरण असल्याचे निदर्शनास आले.

या संयुक्त पाहणी पथकात साखळी आरोग्य खात्याचे सिनेटरी इन्स्पेक्टर राजेश म्हामल, जलस्रोत खात्याचे शाह तसेच होंडाचे सरपंच शिवदास माडकर, पंच कृष्णा गावकर, पंचायत सचिव मुला वरक, कंपनीच्या वतीने तुषार पटेल आदी उपस्थित होते.

खड्ड्यात साठवलेल्या सांडपाण्यामुळे प्रदूषण

या कारखान्यातून उघड्यावर सोडण्यात येणारे सांडपाणी एका मोठ्या खड्ड्यात साठवून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात उग्र वास तसेच डासांचा प्रादुर्भाव होत आहे. याचा त्रास या कारखान्यात काम करणारे तसेच आसपासच्या कारखान्यातील कामगारांनाही होत आहे. तसेच आसपासच्या लोकवस्त्याही यामुळे हैराण आहेत.

Honda IDC Pollution Inspection
Sunburn Festival 2024: CM सावंत ठरवणार ‘सनबर्न’चे भवितव्‍य, सत्ताधारी बाकांवरील आमदारांनीच दर्शवला होता विरोध

कंपनी उपाय योजणार; पटेल

यावेळी उपस्थित असलेले कंपनीचे प्रतिनिधी तुषार पटेल यांनी सांगितले की, ज्या काही त्रुटी आहेत त्या तातडीने पूर्ण करण्यात येतील. कारखान्याकडून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com