Government of India designated GFDC Nodal Agency for all tourism-related activities : केंद्र सरकारने गोवा वन विकास महामंडळाला सीमांकित वनक्षेत्रातील पर्यटनाशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. जीएफडीसी धबधब्यांचा परिसर, पायवाटा, ट्रेक इत्यादी उपक्रमांचे व्यवस्थापन करणार आहे. याबाबतची माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विट करीत दिली.
ट्विट मध्ये असे नमूद करण्यात आले की, "जीएफडीसीच्या अध्यक्षा व आमदार डॉ. देविया राणे वन विभागाच्या अधिकार्यांसह एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करतील. वन महासंचालक आणि केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना याबाबत प्रेझेंटेशन दिले जाईल आणि भविष्यातील योजनांची रूपरेषा सांगितली जाईल."
"वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत, असे सांगण्यात आले की वनक्षेत्रात काम करण्यासाठी जीएफडीसी ही एकमेव अधिकृत एजन्सी असेल. जीएफडीसी सोबत वन विभागातील सर्व वनक्षेत्रातील पर्यटनाशी संबंधित सर्व उपक्रमांसाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला जाईल" असे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.