Goa Government Job: अनुकंपा तत्त्वावर कर्मचारी भरतीसाठी सरकार सज्ज

Goa Government Job: लोकसभा निवडणुकीआधी मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करण्याची तयारी सरकार करत आहे.
Goa Government Job
Goa Government JobDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government Job: लोकसभा निवडणुकीआधी मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करण्याची तयारी सरकार करत आहे. यापैकी 71 जागांवर अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची भरती केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कार्मिक खात्याच्या तशा प्रस्तावास आज मान्यता दिली. येत्या तीन महिन्यांत ही भरती मार्गी लागणार आहे.

Goa Government Job
Golden Peacock Award 2023: शरणार्थींच्या व्यथा मांडणाऱ्या ‘एन्डलेस बॉर्डर्स’ला सुवर्ण मयूर

सरकारी सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसाला सरकार अनुकंपा तत्त्वावर नोकरी देते. या नियुक्त्यांसाठी केवळ पदासाठी आवश्यक ती पात्रता उमेदवाराकडे आहे की नाही, एवढेच पाहिले जाते.

मृत कर्मचारी ज्या खात्यात होता, त्याच खात्यात नियुक्ती होते, असे नाही. सरकार कोणत्याही खात्यात नियुक्ती करते. यासाठी 5 लाख रुपये ही उत्पन्न मर्यादा आहे. जुलैपूर्वी ३ लाख रुपये उत्पन्न मर्यादा होती, ती आता वाढवली आहे. सध्या अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी ३५० जण कार्मिक खात्याकडील प्रतीक्षा यादीवर आहेत.

Goa Government Job
Goa Accident: मुंबईचे कुटुंब बचावले; पण कारचालक दगावला

शिवोलीत वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू वीजप्रवाह अचानक सुरू झाल्याने झाला. त्याच्या कुटुंबीयांनी सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे. त्याविषयी माहिती घेतली असता प्रतीक्षा यादी डावलून प्राधान्य क्रमाने सरकारी नोकरी देणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले. सरकारी पदे भरण्याचे ठरवल्यानंतर त्यातील काही पदे हे अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी ठेवली जातात, असे सांगण्यात आले.

दीड वर्षात 400 जणांना लाभ

गेल्या दीड वर्षात सुमारे 400 जणांना या पद्धतीने सरकारने नोकऱ्या दिल्या आहेत. आताही गोवा राज्य कर्मचारी भरती आयोगाकडे भरती प्रक्रिया सोपवली असली तरी अनुकंपा तत्त्वावरील भरती ही कार्मिक खात्याकडूनच केली जाणार आहे. प्रतीक्षा यादीवरील 71 जणांना पुढील महिन्यात कार्मिक खात्याकडून कागदपत्रे जमा करण्याविषयी पत्र पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com