Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

CM Pramod Sawant: कोमुनिदाद आणि सरकारी जमिनीवरील घरे कायदेशीर करताना जमिनीच्‍या किंमतीसह संबंधितांकडून दंडही वसूल केला जाणार असल्‍याचे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील सरकारी, कोमुनिदाद आणि खासगी जमिनीवर अनेक वर्षांपूर्वी बांधलेली घरे कायदेशीर करण्‍याचा निर्णय केवळ गोमंतकीय जनतेचा विचार करून घेण्‍यात आला आहे. सरकारी, कोमुनिदाद जमिनींवरील घरे कायदेशीर करताना संबंधितांकडून जमिनीच्‍या किमतीसह दंडही वसूल केला जाईल, असे सांगत, कोमुनिदाद जमिनीतील घरे कायदेशीर करताना कोमुनिदादच्‍या पदाधिकाऱ्यांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

७९ व्‍या स्‍वातंत्र्यदिनानिमित्त पणजीत आयोजित राज्‍यस्‍तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, राज्‍यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री बाबूश मोन्‍सेरात, मुख्‍य सचिव डॉ. व्‍ही. कांदावेलू आदी मान्‍यवर यावेळी उपस्‍थित होते.

अनेक गोमंतकीयांनी ६० वर्षांपूर्वी सरकारी, कोमुनिदाद जागांवर घरे बांधले. तेव्‍हापासून आजपर्यंत असे गोमंतकीय घरे कायदेशीर होण्‍याची प्रतीक्षा करीत होते. त्‍यांची ही प्रतीक्षा आपल्‍या सरकारने संपुष्‍टात आणलेली आहे.

CM Pramod Sawant
Comunidade Land: कोमुनिदाद जमिनी लाटू नका! अन्यथा गावकारी संपेल, भूमिपुत्र संपतील, पर्यायाने गोंयकारांसह गोवाही संपेल...

‘माझे घर’ योजनेअंतर्गत सरकारी, कोमुनिदाद जमिनींवर उभारलेली, खासगी जागेत बांधलेली तसेच १९७२ च्‍या सर्व्हे आराखड्यात नोंद असलेली घरे कायदेशीर करण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोमुनिदाद आणि सरकारी जमिनीवरील घरे कायदेशीर करताना जमिनीच्‍या किंमतीसह संबंधितांकडून दंडही वसूल केला जाणार असल्‍याचे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

CM Pramod Sawant
Communidade Land: सावईवेरे कोमुनिदाद कुणाच्या हिताआड येणार नाही पण...! पदाधिकाऱ्यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

कुणबी गाव तीन महिन्‍यांत उभारणार!

सांगेतील कुणबी गावाची उभारणी पुढील तीन महिन्‍यांत करण्‍यात येईल. तसेच फर्मागुडी येथील छ. शिवाजी महाराजांच्‍या डिजिटल वस्‍तूसंग्रहालयाची पायाभरणीही लवकरच करण्‍यात येईल, अशा घोषणा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्‍या.

पणजीतील जुन्‍ता हाऊस, दोनापावला येथील कन्‍वेन्‍शन सेंटर, सर्किट हाऊस, वास्‍को येथील बसस्‍थानक आदी प्रकल्‍प पीपीपी तत्त्वावर उभारण्‍यात येणार असून, त्‍यांचे काम पुढील काहीच महिन्‍यांत सुरू करण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com