माजी सभापतींचे बंधू प्रेमेंद्र शेट यांनी समर्थकांसह मगोत केला प्रवेेश!

माजी सभापती स्व. अनंत शेट यांचे बंधू आणि मये पंचायतीचे विद्यमान पंच प्रेमेंद्र शेट (Premendra Shet) यांनी अखेर मगोच्या 'सिंहा' ला जवळ केले आहे.
Premendra Shet
Premendra ShetDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: माजी सभापती स्व. अनंत शेट यांचे बंधू आणि मये पंचायतीचे विद्यमान पंच प्रेमेंद्र शेट (Premendra Shet) यांनी अखेर मगोच्या 'सिंहा' ला जवळ केले आहे. बुधवारी मये येथे आयोजित कार्यक्रमात मगो नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या समर्थकांसमवेत मगो पक्षात रीतसर प्रवेश केला. प्रेमेंद्र शेट यांनी समर्थकांसमवेत मगो पक्षात प्रवेश केल्याने सुरवातीच्या काळात मगोचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येणाऱ्या मये मतदारसंघातील (Maye Constituency) राजकीय समीकरणे आता बदलण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मये मतदारसंघातून प्रेमेंद्र शेट हेच मगोचे उमेदवार असून, त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहन मगोचे नेते सुदीन ढवळीकर यांनी यावेळी बोलताना केले.

समर्थक मगोत

कुंभारवाडा-मये येथील श्री सातेरी मंदिर सभागृहात आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमास मगोचे नेते ढवळीकर बंधू यांच्यासह माजी आमदार नरेश सावळ, मगोचे उपाध्यक्ष ऍड. नारायण सावंत, जीत आरोलकर, वन-म्हावळींगेचे माजी सरपंच पांडुरंग घोलकर, चोडणचे माजी उपसरपंच प्रसाद कुंडईकर, कारापूर-सर्वणचे पंच योगेश पेडणेकर, मयेचे माजी पंच दिलीप शेट आणि महेश घाडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Premendra Shet
कर्नाटक सरकारची मोठी घोषणा! गोव्यात उभारणार कन्नड भवन

आपले वडीलबंधू माजी सभापती अनंत शेट यांनी मये मतदारसंघात निस्वार्थीपणे भाजपचे 'कमळ' फुलवले. मात्र भाजपकडूनच त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करण्यात आले. अशी खंत प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी आपले मन मोकळे करताना व्यक्त केली. मगो पक्ष हा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष असून, या पक्षाला उज्वल भवितव्य आहे. असे श्री. शेट यांनी नमूद करून आपल्या भावाप्रमाणेच आपण जनतेची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहणार. अशी ग्वाही त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com