Goa Sport : राज्यातील पारंगत खेळाडूंना आता प्रशिक्षक बनण्याची संधी राज्य सरकार देणार आहे. याबाबतची योजना सरकारने जाहीर केली असून खेळाडूंनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 एप्रिलपर्यंत क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याशी संपर्क साधावा असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
धनुर्विद्या, वुशू आणि योगा, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बॉक्सिंग कॅनोइंग व कयाकिंग, सायकलिंग, फेन्सिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, ज्युडो, कब्बडी, खो-खो, रोईंग, शुटिंग, स्विमिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, व्हॉलिबॉल, वेटलिफ्टिंग, व्रेस्टलिंग, वुशू आणि योगा हे 25 क्रिडाप्रकार आहेत.
या विविध प्रकारच्या 25 खेळांमधील पारंगत खेळाडूंना प्रशिक्षक बनण्यासाठी पटियाला (पंजाब) येथील नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्समध्ये जाता यावे, यासाठीची नवी अर्थसहाय्य योजना क्रीडा खात्याने गुरुवारी अधिसूचित केलेली आहे.
योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या खुल्या प्रवर्गातील सहा, तर अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीतील (एसटी) प्रत्येकी एका खेळाडूला या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे असे क्रिडा खात्यामार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
तसेच 21 ते 35 वर्षे वयोगटातील खेळाडू योजनेचा लाभ घेऊ शकतात. उमेदवारांच्या निवडीसाठी क्रीडा संचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. अर्जदारांची कागदपत्रे व अटींच्या पूर्ततेचा विचार करून पात्र उमेदवारांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.