Bal Rath Seva in Goa: गोव्यातील अनुदानित शाळांना बालरथाची सोय उपलब्ध करून दिली जाणार नाही
Bal Rath in GoaDainik Gomantak

Bal Rath Seva: अनुदानित शाळांना बालरथ सेवा मिळणार नाही; शिक्षण खात्याचा निर्णय

Bal Rath Seva in Goa: गोव्यातील अनुदानित शाळांना बालरथाची सोय उपलब्ध करून दिली जाणार नाही
Published on

Bal Rath Seva in Goa

शिक्षण खात्याने जारी केलेल्या निर्णयानुसार आता गोव्यातील अनुदानित शाळांना बालरथाची सोय उपलब्ध करून दिली जाणार नाही. ज्या अनुदानित शाळांना बालरथ पुरवले आहेत ते सुरु राहतील मात्र त्यांच्या दुरुस्ती किंवा देखरेखीची खर्च सरकारकडून उचलला जाणार नाही.

विभागातील मंत्री किंवा आमदारांना बालरथांना मदत करायची असेल तर ते नक्कीच करू शकतात.

अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रवास नीट व्हावा म्हणून सरकारडून बालरथ सेवा पुरवण्यात आली होती. चालक आणि कंडक्टर यांच्या पगारासह बालरथाची देखरेख करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं जायचं. बालरथाची सोय मिळाल्यापासून अनेक अनुदानित शाळांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करायला सुरुवात केली आणि पालकांनी सुद्धा मुलांना सरकारी शाळेतून काढले.

पालकांनी मुलांना शाळेतून काढल्याने सरकारी शाळा बंद होतायत, यंदाच्या वर्षी सात तर गेल्या दहा वर्षांत गोव्यात 135 सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. याचे प्रमुख कारण बालरथ असल्याने सरकारकडून अनुदानित शाळांना बालरथाची सुविधा दिली जाणार नाही.

Bal Rath Seva in Goa: गोव्यातील अनुदानित शाळांना बालरथाची सोय उपलब्ध करून दिली जाणार नाही
गोव्यातील युवक हताश! एकीकडे दुप्पट Unemployment Rate तर दुसरीकडे पैसे घेऊनच नोकरी; सरदेसाईंचा सरकारवर घणाघात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com