Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak

Goa Monsoon: खुशखबर! गोव्यात 'या' तारखेपासून मुसळधार; गोवा वेधशाळेचा अंदाज

हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
Published on

Goa Monsoon: गोव्यात सध्या मॉन्सून दाखल होऊनही गेल्या काही दिवसांत पावसाने पाठ फिरवलेली दिसत आहे. तथापि, आगामी दिवसांमध्ये गोव्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील विविध ठिकाणी येत्या 23 जूनपासून मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे. 23 जूनपासून ते 25 जूनपर्यंत मुसळधार पाऊस होईल. हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

Goa Monsoon
Goa Monsoon: गोव्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे? जाणून घ्या...

गोव्यात मॉन्सून दाखल झाल्यापासून म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे गोव्यातील सर्वच धरणांमधील पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाई जाणवू नये म्हणून सरकारी पातळीवर पाण्याचे नियोजनही केले जात आहे.

तथापि, वेधशाळेच्या या ताज्या अंदाजाने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com