दक्षिण गोव्यातील खाण कामगार, खनिज वाहतूकदारांना काम मिळणार; 10 दहा ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव होणार

Goa mineral auction: दक्षिण गोव्यातील सांगे आणि धारबांदोडा तालुक्यात साठवलेल्या खनिजाचा लिलाव पुकारण्यात येत आहे.
Goa Mining Auction
Goa Mining NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दक्षिण गोव्यातील खाण कामगार आणि खनिज वाहतूकदार यांना काम मिळावे यासाठी सरकारने विशेष प्रयत्न चालवले आहेत. खाण खात्याने आता दहा ठिकाणी साठवलेल्या खनिजाचा लिलाव पुकारण्याचे ठरवले असून यापैकी नऊ ठिकाणे ही दक्षिण गोव्यातील आहेत.

खाण खात्याचे संचालक नारायण गाड यांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी जमिनीवर साठवलेल्या, परंतु भू रूपांतर न भरलेल्या खनिज साठ्यांचा ताबा सरकारने घेतला आहे. अशा २६ पैकी १० ठिकाणच्या साठवलेल्या खनिजाचा (डंप) लिलाव पुकारण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्षातील लिलाव हा जानेवारीत होणार आहे.

Goa Mining Auction
अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

उत्तर गोव्यात पाच खाणी सुरू झाल्याने खाण कामगार व खनिज वाहतूकदार यांना काम मिळाले आहे. त्यामुळे आता दक्षिण गोव्यातील खाण कामगार व वाहतूकदार यांना काम मिळावे यासाठी दक्षिण गोव्यातील सांगे आणि धारबांदोडा तालुक्यात साठवलेल्या खनिजाचा लिलाव पुकारण्यात येत आहे.

Goa Mining Auction
पाकिस्तान जिंदाबाद फलक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सक्त करावाईचे आदेश, अवैध मद्य तस्करीबाबतही इशारा

भारतीय खाण ब्युरोने निश्चित केलेल्या दराच्या २२ टक्के दर हा किमान बोलीचा दर असून बोली लावणाऱ्यांना त्याआधी तपशीलवार प्रकल्प आराखडा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय पहिल्या दोन दशलक्ष टनासाठी तीन कोटी रुपये तर त्या पुढील प्रत्येकी एक दशलक्ष टनामागे एक कोटी रुपये बँक हमी द्यावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com