नोकर भरती प्रक्रिया रद्द करा-काँग्रेस

अशी खंत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते महादेव खांडेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करून ही नोकर भरती प्रक्रिया रद्द करावी.
Congress

Congress

Dainik Gomantak

Published on
Updated on

डिचोली : राज्यात सध्या गाजत असलेल्या नोकर भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून, या घोटाळ्यामुळे पात्र आणि गरजवंत युवक-युवती नोकऱ्यांपासून वंचित झाले आहेत. अशी खंत प्रदेश काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते महादेव खांडेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press conference) व्यक्त करून ही नोकर भरती प्रक्रिया रद्द करावी. माननीय राज्यपाल आणि न्याय व्यवस्थेनेही या प्रकरणाची दखल घ्यावी. अशी मागणी केली आहे. डिचोलीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेवेळी कृष्णा मळीक आणि सुरेश मळीक उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
Goa: हुतात्मा स्मारकांचा पडला विसर..!

सार्वजनिक बांधकाम खात्यात पैशांची लाच घेऊन नोकर भरती झाली असून, संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. असा आरोप सत्ताधारी पक्षातील पणजीचे (Panjim) आमदार बाबूश मोंसेरात यांनी केला आहे. यावरून कथित घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे महादेव खांडेकर यांनी सांगून, या घोटाळ्यामुळे पात्रता असूनदेखील शिकले-सवरलेले आणि गरीब युवक-युवतींना रोजगार मिळणे मुश्किल झाले आहे. लोकशाहीत नोकरी विकत घेणे नव्हे, तर पात्रतेनुसार ती मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. असेही श्री. खांडेकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 'आक्रोश'

मुख्यमंत्री डॉ. सावंत (Pramod Sawant) हे आपल्या मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार देण्यात अपयशी ठरले आहेत. उलट नोकऱ्यां बाबतीत या मतदारसंघात बेरोजगारांची चक्क थट्टा चालली आहे. अशी टीका महादेव खांडेकर यांनी केली आहे. साखळी मतदारसंघातील काही ग्रामीण भागात तर अनेक युवक-युवती उच्च शिक्षित असून, ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही पालकांनी तर पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले आहे. मात्र नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारांसह त्यांचे पालकही विवंचनेत आहेत. आगामी निवडणुकीत (Election) त्याचे निश्चितच परिणाम दिसून येतील. असे श्री. खांडेकर शेवटी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com