Bicholim News : केळबाई मंदिरप्रश्नी 'सुवर्णमध्य' काढा

गोमंतक मंदिर महासंघाची मागणी : आंदोलनाचा इशारा; प्रशासकीय भूमिका महत्वाची
Demand for Gomantak Temple Federation
Demand for Gomantak Temple FederationDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : मयेतील श्री केळबाई देवीचे मंदिर 'बंद'प्रश्नी सरकारने 'सुवर्णमध्य' काढून सध्या निर्माण झालेला वाद सोडवावा. गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले देवीचे मंदिर खुले त्वरित खुले करावे, अशी मागणी गोमंतक मंदिर महासंघाने केली आहे. मंदिर खुले करण्यास टाळाटाळ झाल्यास वेळप्रसंगी आंदोलनही करण्यास मागे राहणार नाही, असेही महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत (भाई) पंडित आणि सचिव जयेश थळी यांनी स्पष्ट केले आहे.

मंदिर खुले होईपर्यंत नागरिकांनी संघटित राहून, तूर्तास संयम पाळावा. याप्रश्नी हिंदू संघटनांनीही पुढे यावे, असे आवाहनही पंडित यांच्यासह थळी यांनी मयेतील नाईक गावकर गटातील लोकांना केले आहे. मंदिर बंद करण्याच्या प्रकाराबद्दल महासंघाने तीव्र नाराजीही व्यक्त केली.

महासंघाचे पंडित आणि थळी यांनी मंगळवारी (ता. ४) सायंकाळी श्री केळबाई मंदिराला भेट देऊन मंदिरातील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नाईक गावकर गटातील महिला मिळून ५०हून अधिकजण उपस्थित होते.

Demand for Gomantak Temple Federation
Tambdi Surla Mahadev Temple: नुकसान करताहेत माकडं मात्र भुर्दंड सोसताहेत गाडेधारक... नेमका काय प्रकार?

महासंघाचे पंडित आणि थळी यांनी उपस्थितांकडून वादाची पार्श्वभूमी जाणून घेतली. मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित नाईक गावकर गटातील लोकांना मार्गदर्शन केले. देवस्थानचा वाद सोडविण्यासाठी महासंघ प्रयत्न करणार. अशी ग्वाहीही देण्यात आली.

Demand for Gomantak Temple Federation
Janhvi Kapoor Visits Balaji Temple: जान्हवी कपूरने तिरुमला मंदिरात घातला दंडवत, पाहा व्हिडिओ

हा तर देवतेचा अवमान

मंदिर खुले करावे, असा आदेश देणारी नोटीस देवालय प्रशासक तथा मामलेदारांनी गेल्या २८ मार्च रोजी जारी केली आहे. मात्र या नोटिशीचे आणि आदेशाचे पालन करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाने पुढील पावले उचललेली नाहीत. हा सरकारी आदेशाचा अवमान तर आहेच. उलट भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री केळबाई देवतेचा अवमान असल्याचे जयेश थळी यांनी म्हटले असून, या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. मंदिर त्वरित खुले करण्यासाठी देवीने संबंधितांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थनाही श्री. थळी आणि पंडित यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com