Gomantak Tanishka's Purument fest 2023 : ‘पुरूमेंत’ गोमंतकीय संस्कृतीचा अविभाज्य घटक! पणजीत आयोजन

‘गोमन्तक तनिष्का पुरूमेंत फेस्त’ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आज शेवटचा दिवस
Purument fest 2023
Purument fest 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

पावसाळ्यापूर्वी लागणाऱ्या जीवनावश्‍यक साहित्याचा साठा करणे, ही आम्हा गोमंतकीयांची परंपरा आहे. पुरूमेंत गोव्याच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे, असे प्रतिपादन ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी केले.

गोमंतकीयांसाठी ही महत्त्वाची संधी असून भविष्यात याहून मोठ्या प्रमाणात या उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल,असेही ते म्हणाले.

‘गोमन्तक पुरूमेंत फेस्त’चे फित कापून उद्‍घाटन केल्यानंतर नायक बोलत होते. यावेळी ‘गोमन्तक’चे मुख्य व्यवस्थापक (व्यवसाय प्रशासन) सचिन पोवार, ज्येष्ठ साहित्यिक दिलीप बोरकर, ‘तनिष्का व्यासपीठ’ प्रमुख मनस्विनी प्रभुणे नायक, वितरण प्रमुख अरूण पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

पावसाळ्याची चाहूल लागली की, महिलांना उत्सुकता लागते ती पुरूमेंताची. हीच गोष्ट हेरून ‘गोमन्तक तनिष्का व्यासपीठ’द्वारे ग्रामीण महिलांना पुरूमेंताचे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठ मिळवून द्यावी, तसेच शहरातील रहिवाशांना पुरूमेंतासाठी लागणारे सर्व साहित्य, खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी मिळावेत, या हेतूने ‘तनिष्का’द्वारे कांपाल येथील सेंट ओरिआसो गार्डनमध्ये उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Purument fest 2023
Dhavali Illegal Scrap Yard : ढवळीतील भंगारअड्डे बेकायदेशीर, मामलेदारांचा अहवाल

पहिल्याच ‘गोमन्तक पुरूमेंत फेस्त’ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. स्वस्त आणि मस्त आणि तेही एकाच ठिकाणी साहित्य मिळत असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने विक्रेत्या महिला देखील समाधान व्यक्त करत आहेत.

संपादक-संचालक नायक म्हणाले, की पुरूमेंताच्या या फेस्तमध्ये खोला व हरमलच्या मिरच्या आल्या आहेत, म्हापश्‍याचे अळसांदे आहेत.ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.

तनिष्का व्यासपीठ महिलांची चळवळ बनावी !

‘तनिष्का व्यासपीठ’द्वारे महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. केवळ उपक्रमच नव्हे तर सामाजिक प्रश्‍न देखील हाताळले जातात. महाराष्ट्रात तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून मोर्चा काढून आपल्या गावातील पाण्याचा प्रश्‍न तसेच इतर प्रश्‍न सोडविले गेले आहेत. तनिष्का व्यासपीठ एक चळवळ बनली आहे, तशी चळवळ गोव्यातही निर्माण होणे गरजेचे आहे. वर्षभरात 50 हजारांहून अधिक महिला या उपक्रमात जोडल्या गेल्याचे समाधान संपादक संचालक राजू नायक यांनी व्यक्त केले.

लोकनृत्य खास आकर्षण

पुरूमेंत खरेदीला येणाऱ्या नागरिकांना खरेदीसोबतच गोमंतकीय लोकसंस्कृती पाहता यावी. अनुभवता यावी यासाठी धालो व फुगडी नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यशकीर्ती सांस्कृतिक मंडळ मुळगाव, श्री विघ्नहर्ता सांस्कृतिक मंडळ केरी-सत्तरी, व श्री घवणाळेश्‍वर स्वयंसहाय्य गट साळ यांनी सादरीकरण केले. उपस्थितांचा या कार्यक्रमाला देखील चांगला प्रतिसाद लाभला.

Purument fest 2023
Ration Scam : लोक खातात म्हणून कसलेही धान्य देऊ नका; फिलिप डिसोझांचा संताप

पुरूमेंत फेस्तमध्ये स्पेशल काय ?

गोमन्तक तनिष्का व्यासपीठ आयोजित पुरूमेंत फेस्तमध्ये पेडणे पासून काणकोण पर्यंतच्या विविध भागात मिळणारे साहित्य उपलब्ध आहेत. या फेस्तमध्ये हरमलची मिरची आहे. म्हापशाचे अळसांदे, काणकोणच्या शेतकऱ्यांनी बनविलेला गूळ, काकवी, सुकी मासळी, नाचणे, उकडे तांदूळ, यासहित इतर विविध साहित्य उपलब्ध आहे.

मी या फेस्तात मिरची, सोले तसेच पुरूमेंताला लागणाऱ्या इतर साहित्यासोबत गावठी केळी आदी साहित्य आणले होते. अर्धे साहित्य दुपार पूर्वीच संपले. मला फेस्तामध्ये ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. पुढेही‘गोमन्तक ’द्वारे अशा उपक्रमातून संधी द्यावी.

-पूजा ठाकूर, विक्रेत्या.

आम्ही आमच्या संस्थेत कौशल्य प्रशिक्षण देतो. शिवणकला, प्लंबिंग व इतर कौशल्याचे प्रशिक्षण देतो. त्यामुळे आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले साहित्य या पुरूमेंत फेस्तमध्ये आम्ही आणले. जेणेकरून महिलांना त्या विकत घेता येतील तसेच तनिष्का माध्यमातून संस्थेलाही प्रसिद्धी मिळेल, हा हेतू होता.

-प्रियंका काळोजी, प्रशिक्षक श्री भूमिका तंत्रज्ञान संस्था, पालये.

मी पहिल्यांदा फेस्तात यायला तयार नव्हते. परंतु तनिष्का च्या महिलांनी मला प्रोत्साहन दिले. तसेच कोकम सोडा विकण्याची कल्पनाही सुचविली. फेस्तात येणारे ग्राहक माझ्याकडील कोकम सोडा आवर्जून विकत घेत असल्याने मीही काही करू शकते, असे मला वाटू लागले आहे.माझ्यातला आत्मविश्‍वास तनिष्का उपक्रमामुळे वाढला.

-संजना नेमण, तनिष्का व्यासपीठ पालये गट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com