Ration Scam : लोक खातात म्हणून कसलेही धान्य देऊ नका; फिलिप डिसोझांचा संताप

माजी मंत्र्यांची सरकारवर टीका : प्रकार खेदजनक, चौकशी व्हावी
Ration Scam
Ration ScamDainik Gomantak
Published on
Updated on

लोकांना धान्य देण्याअगोदर सरकारने ते तपासून देणे गरजेचे आहे. लोक खातात म्हणून कसलेही धान्य देता कामा नये. कारण सरकार जे लोकांना धान्य देते ते जनतेच्याच पैशातून दिले जाते. लोकांचे आरोग्य चांगले राहावे, याची जबाबदारी सरकारची आहे.

जो तांदूळ खाण्यालायक नाही तो लोकांच्या माथी मारला जाणे, ही खेदजनक बाब आहे, असा संताप माजी महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी व्यक्त केला. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

मुरगाव तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानातून किडलेला व निकृष्ट दर्जाचा तांदूळ रेशन कार्डधारकांना वितरित केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. लोकांनीही सरकारच्या नावाने बोटे मोडण्यास सुरुवात केली आहे.

Ration Scam
Chorla Ghat Traffic Jam: चोर्ला घाटात वाहतूक ठप्प! पावलो बस आणि ट्रक नादुरूस्त झाल्याने वाहतुकीचे तीन तेरा

चांगले धान्य पुरवा : गोवा फाॅरवर्ड

लोकांना खराब दर्जाचे धान्य दिल्या प्रकरणी गोवा फाॅरवर्डने जोरदार टीका केली असून हे धान्य त्वरित मागे घ्यावे व त्या बदलात चांगले धान्य द्यावे, अशी मागणी गोवा फाॅरवर्डने केली आहे.पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे, या प्रकारांतून सरकारची लोकांप्रती नसलेली संवेदनशून्यता दिसून येते.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील एकेक गैरप्रकार महाभयानक आहेत व ताजा प्रकार हा त्याचेच एक उदाहरण आहे. सरकारने त्वरित लोकांना बदलून चांगले धान्य दिले नाही तर त्या विरुध्द गोवा फाॅरवर्ड रस्त्यावर येईल असा इशाराही त्यांनी दिला.

Ration Scam
GMC : गोमेकॉत पदव्युत्तरसाठी 41 टक्के आरक्षण जाहीर

यासंदर्भात, फिलिप डिसोझा यांनी सरकारवर टीका केली. स्वस्त धान्य दुकानात धान्य देताना नागरी पुरवठा खात्याने ते तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांनी लोकांना धान्य देण्याअगोदर ते तपासून मगच लोकांना दाखवून वितरण करणे तितकेच गरजेचे आहे. या गोष्टी सरकारने तसेच नागरी पुरवठा खात्याने केल्या नाही म्हणून आज एवढा मोठा प्रकार उघडकीस आला.

तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ परत द्यावा. सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना सबसिडी द्यावी जेणेकरून त्यांच्या खर्चावर नियंत्रण येईल, असेही फिलिप डिसोझा यांनी सांगितले.

दावा दुकानदारांकडून फोल

संचालकांनी कुठ्ठाळी येथे काही स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून चौकशी केली. पार्सेकर यांनी गोदामातील दहाच्या आसपास गोण्या तांदूळ खराब झाल्याचे सांगत व्हायरल फोटो, व्हीडीओ गोदाम गोण्यांचे व तांदळाचे नसल्याचे सांगितले. त्यांचा हा दावा मुरगाव तालुक्यातील अनेक दुकानदारांनी फोल ठरवला.

अशा प्रकारचे सर्वसामान्यांना धान्य देणे दुर्दैवी असून नागरीपुरवठा मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी माजी महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com