विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्‍यांना तणावमुक्त करणे काळाची गरज : प्रा. डॉ. मनस्वी कामत

‘गोमन्तक तनिष्का’तर्फे नवतेजस्विनी कार्यक्रम
Gomantak Navtejaswini
Gomantak Navtejaswini Dainik Gomantak
Published on
Updated on

सध्‍याचे युग हे स्‍पर्धेचे युग आहे. त्‍यामुळे युवकांना अनेक समस्‍यांना, आव्‍हानांना तोंड द्यावे लागतेय. परिणामी त्‍यांच्‍यावरील मानसिक तणाव वाढतोय. त्‍यातूनच मग आत्‍महत्‍येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. हे रोखण्‍यासाठी, युवकांना तणावमुक्त करण्‍यासाठी विशेष उपक्रम राबविले पाहिजेत.

आजची पिढी ही विविध प्रकारच्या तणावातून जात आहे. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्‍यांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, असा सल्ला एम. ई. एस. महाविद्यालयाच्‍या (झुवारीनगर-वास्‍को) प्राचार्य डॉ. मनस्वी कामत यांनी दिला.

‘गोमन्तक तनिष्का’ व्यासपीठाच्या वतीने आयोजित ‘नवतेजस्विनी’ या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. मनस्वी कामत यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम रंगला. ज्येष्ठ साहित्यिक ज्योती कुंकळकर यांनी त्‍यांना बोलते केले. या कार्यक्रमात ‘गोमन्तक’च्या कर्मचारी महिलांनीही सहभाग घेतला.

Gomantak Navtejaswini
Vidya Samiksha Kendra: राज्यातील 2 लाख विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर नजर : मुख्यमंत्री

आजकाल विद्यार्थी वर्गात येऊन शिक्षण घेऊ इच्‍छित नाहीत. परंतु त्यांना वर्गात येऊन अभ्यास करण्यासाठी प्राध्यापकांद्वारे विविध उपक्रम राबविले जातात, असे मनस्वी कामत यांनी सांगितले. आज राज्यातील ८४ टक्के महिला शिक्षित आहेत.

देशभरात महिला शिक्षणाच्या बाबतीत आम्ही चौथ्या क्रमांकावर आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच आपल्याला भविष्यात नेमके काय करायचे आहे हे विद्यार्थ्यांना माहित असले पाहिजे. आजच्या मुली आपल्या ध्येयाबाबत अधिक लक्षकेंद्रित असल्याचेही त्‍या म्‍हणाल्‍या.

आजची युवा पिढी ही आपल्या संस्कृती, परंपरा, पारंपरिक खाद्यपदार्थ, वेशभूषा, विविध सण, उत्सव याबाबत अधिक जागृत आहे. सण-उत्सवात ती आवर्जुन सहभागी होते.

आमच्या महाविद्यालयांत विविध सणांच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जातात. काही दिवसांपूर्वी भरड धान्य वर्षाच्या अनुषंगाने पारंपरिक खाद्यपदार्थांच्‍या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुलींपेक्षा मुलांनीच सहभाग अधिक घेतला होता ही महत्त्वपूर्ण बाब असल्याचे कामत यांनी सांगितले.

दरवर्षी एका विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या

आजची युवा पिढी ही अनेक प्रकारच्या ताणतणावात जीवन जगत आहे. प्रत्येक महाविद्यालयातील किमान एक विद्यार्थी दरवर्षी आत्महत्या करत आहे.

त्‍यामुळे राज्‍य सरकारने आता प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशक नेमले असून त्‍यांच्याद्वारे विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जातोय.

शासनाद्वारे राबविण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे प्राचार्य डॉ. मनस्वी कामत यांनी सांगितले.

Gomantak Navtejaswini
Canacona: काणकोणात खासगी विद्यालयाचे कार्यालय फोडले, 67 हजारांची रोकड लंपास

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com